
मुंबई | प्रतिनिधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे – मात्र यावेळी कारण आहे तिच्या खासगी आयुष्यातील एका इंस्टाग्राम पोस्टमुळे!
ऑस्ट्रेलियातील प्रवासादरम्यान साऱ्याने शेअर केलेली "Love found in Australia" ही कॅप्शन आणि एक आकर्षक फोटो सध्या इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे. अनेक नेटिझन्स या पोस्टमागे कोण ‘Love’ आहे याचा शोध घेत आहेत.
साराने पोस्टमध्ये तिच्या हातात एक सुंदर टेडी बिअर असलेला फोटो शेअर केला असून, त्यासोबत लिहिलंय – “Love found in Australia”. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये उत्सुकता वाढली आहे. हे ‘प्रेम’ व्यक्ती आहे की फक्त ऑस्ट्रेलियातील एखादा क्षण? यावर सोशल मीडियावर चर्चेचा धडका सुरू आहे.
सारा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते आणि तिच्या सौंदर्यामुळे व व्यक्तिमत्त्वामुळे तिचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टकडे लक्ष वेधलं जातं. या नव्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी अनेक शक्यता मांडायला सुरुवात केली आहे – काहींनी क्रिकेटर शुभमन गिलचं नाव पुन्हा चर्चेत आणलं, तर काहींनी म्हटलं, "हे फक्त ऑस्ट्रेलियातलं प्रेमळ वातावरण असावं."