पायलट बेशुद्ध, २०० प्रवाशांसह विमान १० मिनिटं हवेत बेवारस; पुढे काय घडलं?

Published : May 18, 2025, 11:51 AM IST
Lufthansa Airlines

सार

१७ फेब्रुवारी २०२४ला लुफ्थांसाच्या एअरबस A321 विमानातील को-पायलट बेशुद्ध पडल्याने विमान १० मिनिटे पायलटशिवाय उडाले. कॅप्टनला कॉकपिटमध्ये प्रवेश मिळेनासा झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. सुदैवाने, कॅप्टनने विमान सुरक्षितपणे माद्रिदमध्ये उतरवले.

Lufthansa Airlines च्या एका विमानात प्रवाशांनी थरारक अनुभव घेतला. तब्बल १० मिनिटं हे विमान पायलटशिवाय हवेत उड्डाण करत होतं. ही धक्कादायक घटना १७ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून, यासंदर्भातील अधिकृत अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.

फ्रँकफर्टहून स्पेनच्या सेव्हिलकडे जाणाऱ्या एअरबस A321 विमानात १९९ प्रवाशी आणि सहा क्रू मेंबर्स होते. मुख्य कॅप्टन शौचालयासाठी बाहेर गेला असताना, कॉकपिटमध्ये एकटाच असलेला को-पायलट अचानक बेशुद्ध पडला. परिणामी, विमान ऑटोपायलटवर असूनही, तब्बल दहा मिनिटं कोणत्याही वैमानिकाच्या नियंत्रणाशिवाय आकाशात उड्डाण करत होते.

स्पॅनिश अपघात तपास प्राधिकरणाच्या अहवालानुसार, को-पायलट बेशुद्ध पडल्याच्या क्षणी कॉकपिटमधून अज्ञात आणि विचित्र आवाज रेकॉर्ड झाला आहे. या वेळी कॅप्टनने परत येत कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या कारणास्तव, कॉकपिटचा दरवाजा कोड टाकल्यावर आतून उघडावा लागतो. पण पाच वेळा प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्यामुळे कॅप्टन अधिक चिंतेत पडला.

शेवटी, आपत्कालीन कोडचा वापर करत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरु असताना, गंभीर अवस्थेत असलेल्या को-पायलटनं कसाबसा दरवाजा उघडला. तातडीने परिस्थिती हाताळत कॅप्टनने विमान माद्रिदमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवलं.

लुफ्थांसा एअरलाईन्सकडून या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कंपनीच्या उड्डाण सुरक्षा विभागाने याची आंतरिक चौकशी केली असून, सध्या त्यांचा अहवाल मात्र सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

या घटनेमुळे विमानातील सुरक्षा व्यवस्था, ऑटोपायलट प्रणाली आणि आपत्कालीन प्रोटोकॉल यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा प्रसंग भविष्यातील उड्डाण सुरक्षेसाठी मोठा धडा देणारा ठरतो.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Google वर पाकिस्तानमधील लोक सर्वाधिक काय सर्च करतात? वाचून व्हाल हैराण
Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती