पंतप्रधान नरेंद्र मोदी Ahlan Modi कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक, भारतीय प्रवाशांवर गर्व असल्याची दिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबू धाबीमधील (Abu Dhabi) जायद स्पोर्ट्स सिटी स्टेडिअममध्ये Ahlan Modi कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानाचे भाषण देखील होणार आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 13, 2024 7:04 AM IST / Updated: Feb 13 2024, 12:39 PM IST

PM Narendra Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (13 फेब्रुवारी) युएईच्या दोन दिवस दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांचे अबू धाबीमधील जायद स्पोर्ट्स सिटी (Zayed Sports City) स्टेडिअममध्ये Ahlan Modi कार्यक्रमादरम्यान भाषण देखील होणार आहे.

Ahlan Modi कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले की, “आम्हाला आमच्या भारतीय प्रवासी आणि जगाचे भारतासोबत असलेले नाते अधिक दृढ होण्याबद्दलच्या प्रयत्नाबद्दल अधिक गर्व आहे. आजच्या अहलान मोदी कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरात येथील भारतीय प्रवाशांना भेटण्यासाठी अधिक उत्सुक आहे.”

'अहलान मोदी' कार्यक्रमासाठी 65 हजारांहून अधिक नागरिकांनी केले रजिस्ट्रेशन
'अहलान मोदी' कार्यक्रमासाठी 65 हजारांहून अधिक नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. इंडियन पीपल फोरमचे अध्यक्ष आणि अहलान मोदी उपक्रमाचे नेते जितेंद्र वैद्य यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. जितेंद्र वैद्य यांनी म्हटले की, हा एक अनोखा उपक्रम आहे.

'वसुधैव कुटुंबकम' असा कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारत आणि युएईमधील नातेसंबंध उत्तम आहेत. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यात परदेशातील भारतीय समुदाय महत्त्वाची भुमिका बजावत आहे. पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवण्यासाठी युएईमधील परदेशी भारतीय समुदायाकडून 'अहलान मोदी' नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती
'अहलान मोदी' कार्यक्रमासाठी भारतीय समुदायातील महिला मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले आहे. ‘अहलान मोदी’ कार्यक्रमात 700 हून अधिक कलाकारांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्राच्या माध्यमातून भारतीय कलांच्या विविधतेची झलक पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : 

Digital Payments : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॉरिशस, श्रीलंका येथे UPI - RuPay सुविधेचा शुभारंभ (Watch Video)

कतारच्या तुरुंगातून आठ पैकी सात माजी नौसैनिक भारतात परतले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार (Watch Video)

Viral Video : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीच्या विजयास्तव कंडोमचा फुग्याप्रमाणे वापर? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Share this article