Nepal Violence : नेपाळमध्ये निदर्शकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली. त्यामुळे नेत्यांना चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविले जात आहे. जनतेच्या रागातून नेत्यांना वाचवण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
नेपाळमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर जनतेने नेत्यांना रस्त्यांवर पळवत मारहाण केली. या दरम्यान एका घराच्या छतावरून काही नेत्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचविण्यात आले. यावेळी एकाच दोरीवर अनेक नेते लटकलेले दिसले.
210
हिल्टन हॉटेलला आग
नेपाळच्या राजधानी काठमांडूमधील सर्वात उंच हिल्टन हॉटेलला निदर्शकांनी आग लावली. हे हॉटेल जुलै २०२४ मध्ये पूर्ण झाले होते. ते बनवण्यासाठी ५०० कोटी भारतीय रुपये खर्च झाले होते.
310
झापामध्ये हिंसाचार
कथित भ्रष्टाचारावरून सरकारविरोधात हिंसक निदर्शने झाल्यानंतर नेपाळच्या झापामध्ये बुधवारी जळालेल्या अवशेषांजवळ बसलेला एक व्यक्ती.