NASA Suit: एका सूटची किंमत इतकी की 7 पिढ्या बसून खातील, आकडा ऐकून व्हाल थक्क!

Published : May 04, 2026, 09:26 PM IST

NASA Suit: जगातला सगळ्यात महागडा ड्रेस कोणता आहे माहित्येय? तो म्हणजे नासाच्या अंतराळवीरांचा स्पेस सूट. या एका सूटच्या किंमतीत तुम्ही आयुष्यभर कोणतंही काम न करता आरामात जगू शकता. चला तर मग, जाणून घेऊया या स्पेस सूटची किंमत नेमकी आहे तरी किती.

PREV
14
जगातला सगळ्यात महागडा ड्रेस
फॅशनच्या जगात लोक लाखो रुपये खर्च करून महागडे कपडे खरेदी करतात. पण जगातला सगळ्यात महागडा ड्रेस कोणता आहे माहित्येय? तो म्हणजे अंतराळवीर वापरतात तो स्पेस सूट. याची किंमत लाखात नाही, तर तब्बल शेकडो कोटींमध्ये आहे. या पैशात एखाद्या कुटुंबाच्या सात पिढ्या काहीही काम न करता आरामात जगू शकतील.
24
एका नासा स्पेस सूटची किंमत किती?

नासाचे अंतराळवीर जेव्हा अंतराळात जातात, तेव्हा त्यांना स्पेस सूट घालणं बंधनकारक असतं. हा सूट म्हणजे एक छोटं अंतराळयानच (space ship) असतं. हा सूट त्यांना अंतराळातील शून्य तापमान, प्रचंड उष्णता, थंडी आणि रेडिएशनपासून वाचवतो. एका नासा स्पेस सूटची किंमत तब्बल 100 कोटी रुपये आहे. आता तर नासा यापेक्षाही महागडे स्पेस सूट तयार करत आहे.

34
स्पेस सूट कसा बनतो?

हा स्पेस सूट 16 थरांपासून (layers) बनवतात. प्रत्येक थरात एक खास मटेरियल वापरलेलं असतं. हे मटेरियल दाब आणि तापमानातील बदल नियंत्रित करतं. यामुळे अंतराळवीरांचं बाह्य धोक्यांपासून संरक्षण होतं. नुसत्या हेल्मेटची किंमतच अडीच कोटी रुपये असते. बूट आणि ग्लोव्ह्ज मिळून खर्च आणखी काही कोटींनी वाढतो. पाठीवर एक बॅकपॅक असतो, जो लाईफ सपोर्ट सिस्टीमचं काम करतो. हा बॅकपॅक ऑक्सिजन पुरवतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर काढतो आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठीही आवश्यक असतो.

44
नव्या सूटच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 8,350 कोटी रुपयांचा खर्च

नासा आपल्या भविष्यातील मोहिमांसाठी नेहमीच तयारी करत असतं. यासाठी ते नवीन आणि आधुनिक सूट विकसित करत आहेत. अशाच एका नव्या सूटच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 8,350 कोटी रुपये खर्च झाले आहेत. चंद्रावरच्या मोहिमेसाठी हे सूट बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट नासाने काही मोठ्या कंपन्यांना दिलं आहे. सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व दिलं जात असल्यामुळे प्रत्येक भागाची हजारो वेळा चाचणी केली जाते. स्पेस सूटशिवाय अंतराळवीर अवकाशात दोन मिनिटंही जगू शकत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि बाहेरील दाब नसल्यामुळे त्यांचं रक्त अक्षरशः उकळू लागेल आणि त्यांचा मृत्यू होईल.

Read more Photos on

Recommended Stories