Meta Subscription: मेटा आता आपले लोकप्रिय अॅप्स इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स आणत आहे. या 'प्लस' प्लॅन्सद्वारे, युझर्स पैसे देऊन खास AI फीचर्स, कस्टमायझेशन आणि इतर प्रीमियम सुविधांचा लाभ घेऊ शकतील.
इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे
आजकाल स्मार्टफोनशिवाय जगणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. एकवेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण फोन पाहिल्याशिवाय चैन पडत नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. त्यातही इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही, असं वाटणाऱ्यांसाठी ही एक शॉकिंग बातमी आहे. कारण आता या अॅप्ससाठी पैसे द्यावे लागू शकतात.
26
पैसे भरा आणि वापरा अॅप्सचे प्रीमियम फीचर्स
पण घाबरून जाण्याची गरज नाही. संपूर्ण माहिती नीट वाचा. जर तुम्हाला या अॅप्सचे प्रीमियम फीचर्स वापरायचे असतील, तरच पैसे द्यावे लागतील. मेटाने या तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केले आहेत. म्हणजेच, तुम्ही पैसे भरल्यास तुम्हाला विशेष फीचर्स मिळतील. या नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनचं वैशिष्ट्य म्हणजे, प्रीमियम फीचर्ससोबतच युझर्सना खास आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्सचाही फायदा मिळेल, ज्यामुळे रोजची कामं सोपी होतील.
36
प्लस प्लस योजना
मेटाच्या प्रोडक्ट हेड, नाओमी ग्लीट (Naomi Gleit) यांनी जाहीर केलं की, कंपनी आपल्या अॅप्स आणि AI प्रोडक्ट्समध्ये अत्याधुनिक टूल्स आणत आहे. युझर्स पैसे देऊन हे वापरू शकतील. मेटाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही फेसबुक प्लस, इन्स्टाग्राम प्लस आणि व्हॉट्सअॅप प्लस लाँच करत आहोत, ज्यात लोकांना आवडतील असे प्रगत फीचर्स असतील."
मेटाच्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लससाठी दरमहा $3.99 (अंदाजे ₹380) मोजावे लागतील. तर व्हॉट्सअॅप प्लससाठी दरमहा $2.99 (अंदाजे ₹290) खर्च येईल. हे प्लॅन्स येत्या काही आठवड्यांत जगभरात लाँच होण्याची शक्यता आहे.
56
विशेष वैशिष्ट्ये
या सबस्क्रिप्शन प्लॅन्समध्ये युझर्सना प्लॅटफॉर्मवर खास फीचर्स मिळतील. यात कस्टमायझेशन, मेसेजिंग आणि ऑडियन्स एंगेजमेंटसाठी अधिक चांगले पर्याय असतील. इन्स्टाग्राम प्लस सबस्रायबर्सना स्टोरीज, प्रोफाइल कस्टमायझेशन आणि अतिरिक्त प्रोफाइल पिनवर अधिक नियंत्रण मिळेल.
66
फेसबुक प्लस वापरकर्ते
फेसबुक प्लस युझर्सना अधिक चांगले स्टोरी फीचर्स, जास्त अॅनिमेटेड रिअॅक्शन्स आणि प्रोफाइल पर्सनलायझेशन टूल्स मिळतील. त्याचप्रमाणे, व्हॉट्सअॅप प्लस सदस्यांना प्रीमियम स्टिकर्स, अॅप थीम्स, कस्टम रिंगटोन आणि अधिक चॅट्स पिन करण्याची सुविधा मिळेल. कंपनी 'मेटा वन' (Meta One) अंतर्गत हे फीचर्स लाँच करत आहे, ज्यात विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा समावेश आहे. मेटाने सांगितले की, ही AI-केंद्रित सबस्क्रिप्शन सुरुवातीला काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तपासली जाईल.