Indian language : हिंदी ही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.प्रामुख्याने हिंदी भाषा उत्तर भारतात बोलली जाते. जगात असेही देश आहेत, जिथे हिंदी भाषा बोलली किंवा समजली जाते. आज आपण अशा सात देशांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे हिंदी भाषेचा वापर केला जातो.
पाकिस्तानमध्ये हिंदी मोठ्या प्रमाणावर वापरली जात नसली तरी, तेथील लोकांना हिंदी समजू शकते. पाकिस्तानची राष्ट्रभाषा असलेल्या उर्दूशी असलेले साम्य हे याचे कारण आहे. बॉलिवूडचा प्रभावही यासाठी कारणीभूत आहे.
27
नेपाळ
प्रादेशिक संबंध, चित्रपट, संगीत आणि भारतासोबतची सीमा या सर्वांमुळे नेपाळमध्ये हिंदीला लोकप्रियता मिळाली आहे. हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जात नसली तरी, नेपाळमधील लोकांना ही भाषा समजू शकते.
37
मॉरिशस
मॉरिशसमधील शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिंदीचा वापर केला जातो. पूर्वीपासून तिथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक असलेल्या भारतीय वंशांच्या कुटुंबांमध्ये परंपरागत हिंदीला खूप महत्त्व दिले जात होते.
पूर्वी झालेल्या स्थलांतरामुळे फिजीमध्ये हिंदीला मोठी लोकप्रियता आहे. आजही अनेक घरांमध्ये आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये इंडो-फिजियन गट हिंदीचा वापर करतात.
57
सुरिनाम
हिंदीशी जवळचा संबंध असलेली 'सरनामी हिंदुस्तानी' आजही इंडो-सुरिनाम कुटुंबांमध्ये आणि सांस्कृतिक वर्तुळात दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
67
त्रिनिदाद आणि टोबॅगो
भारतीय वारसा असलेल्या काही कुटुंबांमध्ये आणि सणांमध्ये 'इंडो-कॅरिबियन हिंदुस्तानी' प्रचलित आहे.
77
गयाना
इंडो-गयानीज घरांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि जुन्या सामाजिक परंपरांमध्ये आजही हिंदीचा वापर केला जातो.