कॅनडा विमानतळावर काय घडलं? एअर इंडियाच्या पायलटला ताब्यात का घेतलं? मोठी दुर्घटना टळली का?

Published : Jan 01, 2026, 01:19 PM IST

Air India Pilot Detained in Vancouver Over Alcohol : कॅनडाच्या व्हँकुव्हर विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI186 फ्लाइटच्या पायलटला उड्डाणापूर्वीच ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली. पायलटच्या तोंडाला दारूचा वास येत असल्याच्या संशय होता.

PREV
16
कॅनडाहून दिल्लीला जाणारी AI186 फ्लाइट का उशिरा सुटली?

कॅनडाच्या व्हँकुव्हर विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI186 या आंतरराष्ट्रीय फ्लाइटच्या कॉकपिट क्रू सदस्याला उड्डाणापूर्वी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली. पायलटला दारूचा वास येत असल्याचा संशय होता. या कारवाईमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि प्रवाशांमध्ये चिंता वाढली.

26
उड्डाणापूर्वी पायलटला का उतरवण्यात आले?

23 डिसेंबर 2025 रोजी व्हँकुव्हर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान, कॅनडाच्या अधिकाऱ्यांना कॉकपिट क्रूच्या एका सदस्याच्या फिटनेसवर संशय आला. अधिकाऱ्यांच्या मते, पायलटच्या तोंडाला दारूसारखा वास येत होता, त्यामुळे नियमांनुसार त्याला उड्डाणापूर्वीच विमानातून उतरवून पुढील चौकशीसाठी नेण्यात आले.

36
प्रवाशांची सुरक्षा धोक्यात होती का?

विमान वाहतुकीच्या नियमांनुसार, कोणताही पायलट पूर्णपणे तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू शकतो. त्यामुळेच अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने कारवाई केली आणि सुरक्षेला प्राधान्य दिले.

46
फ्लाइट AI186 ला उशीर का झाला?

पायलटला हटवल्यानंतर एअर इंडियाला तातडीने दुसऱ्या पायलटची व्यवस्था करावी लागली. या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे व्हँकुव्हरहून दिल्लीला जाणारी फ्लाइट AI186 नियोजित वेळेपेक्षा उशिराने निघाली.

56
एअर इंडियाने या प्रकरणावर काय म्हटले?

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच, सुरक्षा नियमांचे कोणतेही उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि कंपनी 'झिरो टॉलरन्स पॉलिसी'चे पालन करते, असेही एअरलाइनने स्पष्ट केले.

66
पायलटवर पुढे काय कारवाई होणार?

एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पायलटला फ्लाईंग ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. तपासात नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास, कंपनी आपल्या धोरणानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करेल.

Read more Photos on

Recommended Stories