जगातील सर्वोत्कृष्ट डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्यात भारत यशस्वी, नोबेल पारितोषिक विजेते A Michael Spence यांनी केले कौतुक

भारत देशाची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील सर्वात जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आयएमएफसह (IMF) कित्येक मोठ्या संस्था भारताच्या सर्वोच्च विकास दरासंदर्भात सकारात्मक आहेत.

Indian Economic Growth: भारत देशाची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील सर्वात जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आयएमएफसह (IMF) कित्येक मोठ्या संस्था भारताच्या सर्वोच्च विकास दरासंदर्भात सकारात्मक आहेत. यादरम्यान नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ ए. मायकल स्पेन्स (A Michael Spence) यांनीही भारत देशाबाबत मोठे विधान करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. "जगातील सर्वोत्कृष्ट डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्यामध्ये भारत देश यशस्वी झाला आहे”, अशा शब्दांत स्पेन्स यांनी कौतुक केले आहे. ए. मायकल स्पेन्स यांना वर्ष 2001मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सर्वाधिक विकासदर गाठणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत - ए. मायकल स्पेन्स ग्रेटर नोएडा येथील बेनेट विद्यापीठामध्ये (Bennett University) विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना ए. मायकल स्पेन्स म्हणाले की, आताच्या परिस्थितीनुसार भारत ही संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक संभाव्य विकासदर (GDP Growth) गाठणारी अर्थव्यवस्था आहे. भारताने आतापर्यंत जगातील सर्वात उत्तम डिजिटल अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्था प्रणाली विकसित केली आहे. जी खुल्या, स्पर्धात्मक आणि मोठ्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक सेवा प्रदान करते”.

जागतिक व्यवस्थेवर काय म्हणाले स्पेन्स? नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ ए. मायकल स्पेन्स पुढे असेही म्हणाले की, "जग सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल अनुभवत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या प्रवासाविषयी बोलताना स्पेन्स म्हणाले की, महामारी, भू-राजकीय तणाव आणि हवामान बदलामुळे 70 वर्षे जुनी जागतिक व्यवस्था मोडकळीस येत आहे”.

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होताहेत मूलभूत बदल ए. मायकल स्पेन्स म्हणाले की, "जागतिक पुरवठा साखळी यासारख्या आर्थिक मापदंडांवर तयार झालेली जागतिक व्यवस्था खूप वेगाने बदलत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन घडत आहे, ज्यामुळे पुरवठा साखळीमध्ये विविधता दिसून येत आहे आणि जागतिक प्रशासन पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे होत आहे."

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी Ahlan Modi कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक, भारतीय प्रवाशांवर गर्व असल्याची दिली प्रतिक्रिया

Digital Payments : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॉरिशस, श्रीलंका येथे UPI - RuPay सुविधेचा शुभारंभ (Watch Video)

कतारच्या तुरुंगातून आठ पैकी सात माजी नौसैनिक भारतात परतले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार (Watch Video)

Share this article