पुरुषांना गावात बंदी असताना महिला होतात गर्भवती, गावातील रहस्यमय गोष्ट घ्या जाणून

Published : Oct 03, 2025, 10:01 PM IST
ujovo kenia

सार

आफ्रिकेतील केनियामध्ये उमोजो नावाचे एक गाव आहे, जिथे फक्त महिला राहतात आणि पुरुषांना प्रवेशास सक्त मनाई आहे. १९९० मध्ये काही महिलांनी स्थापन केलेल्या या गावात, महिलांना कुटुंब वाढवण्यासाठी गावाबाहेर जाऊन संबंध ठेवण्याची परवानगी आहे. 

जगात असं एखाद गाव असेल की जिथं एकही पुरुष नाही, यावर तुमचा विश्वास बसतो का? हा बरोबर आहे जगात असं एक गाव आहे, येथे फक्त महिलाच राहतात. या गावातील लोकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याठिकाणी बाहेरच्या पुरुषाला आतमध्ये यायला परवानगी नाही. तरीही या गावातील लोकसंख्या कशी वाढते हा प्रश्न सर्वांना पडत असतो.

पुरुषाने चुकून प्रवेश करायचा प्रयत्न केला तर... 

जर या गावात पुरुषाने चुकूनही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर महिलांकडून त्याला कठोर शिक्षा दिली जाते. आफ्रिका खंडातील केनिया या देशामध्ये उमोजो नावाचे गाव आहे. १९९० च्या दशकात काही महिलांनी मिळून या गावाची स्थापना केली होती. जर एखाद्या महिलेला या ठिकाणी मुलगा असेल तर त्याला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर घर सोडावं लागत.

महिलांना पुरुषांशी संबंध ठेवण्याची परवानगी 

या गावातील महिलांना मात्र पुरुषांशी संबंध ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एखाद्या महिलेला कुटुंब वाढायचं असेल तर तिला गावाच्या बाहेर जायचं असेल तर ती संबंध ठेवू शकते आणि कुटुंब वाढवू शकते. त्या महिलेच्या कुटुंबातील मुलगा १८ वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर घर सोडू शकतो आणि नंतर तिला तिच्या मुलाला निरोप द्यावा लागतो.

महिलांवर दिली जबाबदारी 

महिलांवर या गावातील सर्व प्रकारची जबाबदारी देण्यात येते. काही वर्षांपूर्वी एका फोटोग्राफरने या गावात प्रवेश केला आणि फोटो घेतले. त्यानंतर या गावाबाबतची माहिती समोर आली होती. या गावात नंतर पुरुष येण्यावर बंदी घालण्यात आली. या गावात फक्त महिला राहत असून येथे पुरुषांना बंदी घालण्यात आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Airport checking : बॉडी स्कॅनरमधून जात असताना नेमके काय दिसते? जाणून घ्या वास्तव
''यावेळी गोळी लक्ष्यावर लागेल'', इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना थेट जीवे मारण्याची धमकी