जगभरात राम नामाचा गजर, जर्मनीतील गायिकेने मधुर आवाजात गायिले 'राम आएंगे तो अंगना' गाणे (Watch Video)

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा उत्साह जगभरात दिसून येत आहे. अशातच जर्मनीतील एका गायिकेने आपल्या मधुर आवाजात प्रभू श्रीरामांचे एक गाणे गायिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Chanda Mandavkar | Published : Jan 19, 2024 11:31 AM IST / Updated: Jan 19 2024, 05:06 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच संपूर्ण जगभरात प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामांच्या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जर्मनीतील एका गायिकेने (German Singer) आपल्या मधुर आवाजात चक्क हिंदी भाषेतून प्रभू श्रीरामांसाठी गाणे गायले आहे.

गायिकेने गायले 'राम आएंगो तो अंगना' गाणे
‘राम आएंगे तो अंगना’ (Ram Aayenge To Angana) गाणे गायिलेल्या जर्मनीमधील गायिकेचे नाव कॅसॅन्ड्रा मे स्पिटमन (Cassandra Mae Spittmann) आहे. कॅसॅन्ड्राने गायिलेले गाणे भारतात खूप प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) गायिकेला या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

मंदिराबद्दलच्या काही खास गोष्टी
राम मंदिर हे पारंपरिक नागर शैलीत (Nagara Style) बांधण्यात आले आहे. भाविकांना सिंह दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मंदिर 161 फूट उंचीचे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिरामध्ये 329 स्तंभ आणि 44 दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरातील स्तंभांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सेवा उपलब्ध असणार आहे.

आणखी वाचा : 

अयोध्येत उभारणार 7 स्टार Vegetarian Retreat, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची घोषणा

57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत

Share this article