Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या, अमेरिकेचा ध्वज 4 दिवस अर्ध्यावर उतरवण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

Published : Sep 11, 2025, 08:23 AM IST
Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या झाडून हत्या, अमेरिकेचा ध्वज 4 दिवस अर्ध्यावर उतरवण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

सार

Charlie Kirk Shot Dead : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे निकटवर्तीय सहकारी चार्ली किर्क यांच्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. सदर घटना युटामधील एका कार्यक्रमादरम्यान घडली.

Charlie Kirk Shot Dead : अमेरिकेच्या युटा राज्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे निकटवर्तीय सहकारी चार्ली किर्क यांची गोळीबारात हत्या करण्यात आली. ही घटना व्हॅली युनिव्हर्सिटीत ‘द अमेरिकन कमबॅक टूर’ कार्यक्रमादरम्यान घडली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किर्क एका पांढऱ्या तंबूखाली बसून भाषण करताना दिसत आहेत. अचानक गोळीबार होतो आणि गोळी त्यांच्या मानेजवळ लागते. रक्तस्त्राव झाल्यानंतर ते जमिनीवर कोसळतात. घटनास्थळी अफरातफरी माजते आणि उपस्थित लोक ओरडत पळू लागतात.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून शोक व्यक्त

चार्ली किर्क यांच्या निधनाबद्दल डोनाल्ड ट्रंप यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, “खऱ्या अमेरिकन देशभक्ताच्या सन्मानार्थ, मी रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे आदेश देत आहे.” ट्रंप म्हणाले की, अमेरिकेतील तरुणांना चार्लीपेक्षा कोणीही चांगले समजत नव्हते. युटाचे मेयर डेव्हिड यंग यांनी पुष्टी केली की, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

चार्ली किर्क कोण होते?

३१ वर्षीय चार्ली किर्क हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी टर्निंग पॉइंट यूएसए या संस्थेची स्थापना केली होती, ज्याद्वारे ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना राजकारणाबद्दल सांगत असत. ते ट्रंप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते आणि तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाला होता हल्ला 

१३ जुलै रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियातील एका निवडणूक रॅलीदरम्यान हल्ला झाला होता. २० वर्षीय आरोपीने सुमारे ४०० फूट अंतरावरून सलग ८ गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला घासून गेली. या घटनेनंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर