Canada Election Results 2025 : मार्क कार्नी यांनी निवडणूक जिंकली, लिबरल आघाडीवर

Vijay Lad   | ANI
Published : Apr 29, 2025, 11:30 AM ISTUpdated : Apr 29, 2025, 11:34 AM IST
Canada Election Results 2025 : मार्क कार्नी यांनी निवडणूक जिंकली, लिबरल आघाडीवर

सार

कॅनडामध्ये पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळेल का हे अजून स्पष्ट नाही. कार्नी यांनी ट्रम्प यांना आव्हान देत विजय मिळवला आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे.

Canada Election Results 2025: कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने विजय मिळवला आहे. त्यामुळे मार्क कार्नी यांचा पंतप्रधानपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर कार्नी पंतप्रधान झाले होते. यु.के. आणि कॅनडामध्ये ते केंद्रीय बँकेचे माजी गव्हर्नर आहेत.

बँकर ते राजकारणी अशी ओळख असलेले मार्क कार्नी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान दिले होते. त्यानंतर जबर आव्हान पेलत त्यांनी कॅनडामध्ये लिबरल पक्षाला विजय मिळवून दिला आहे. अजून मतमोजणी सुरू आहे. लिबरल १५८ जागांवर आघाडीवर आहेत. तर कंझर्व्हेटिव्ह्ज १४७ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे येथेही काटे की टक्कर दिसून येत आहे. ब्लॉक क्यूबेकॉइस पक्ष २५ जागांवर आघाडीवर आहे. एनडीपी १० जागांवर, ग्रीन्स २ जागांवर आणि सध्या पीपीसी किंवा इतर पक्षांकडे एकही जागा नाही. कॅनेडियन संसदेत बहुमत मिळवण्यासाठी एकूण १७२ जागांची आवश्यकता असते.

पंतप्रधान मार्क कार्नी विजयी

पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ओटावा येथील आपला मतदारसंघ जिंकला आहे. मार्क कार्नी १६९४ मध्ये बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाल्यापासून बँकेचे नेतृत्व करणारे पहिले बिगर-ब्रिटिश व्यक्ती होते. ते कॅनडाच्या केंद्रीय बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये ते कॅनडाचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सामील झाले.

त्यांच्या लिबरल पक्षाला संसदेत कंझर्व्हेटिव्ह्जच्या तुलनेत ३४३ जागांपैकी अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, लिबरल्सना पूर्ण बहुमत मिळेल का हे अनिश्चित आहे. त्यामुळे ते इतर पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहून कायदे पारित करू शकतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती कॅनडावर कब्जाची धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर कब्जा करण्याची धमकी दिली होती. कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला होता. निवडणुकीत हा केंद्रीय मुद्दा बनला होता. पंतप्रधान मार्क कार्नी निवडणुकीत जनतेला हा ट्रम्पविरोधी संदेश देण्यात यशस्वी झाले. कॅनडात राष्ट्रभावना जागृत करण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी अमेरिकेच्या पलीकडे व्यापार वाढवण्याचा संकल्प केला. अमेरिकन धोरणांविरुद्ध कडक इशारा दिला. ते म्हणाले, "त्यांना आमची संसाधने, आमचे पाणी, आमची जमीन, आमचा देश हवा आहे. ते काहीही घेऊ शकत नाहीत."

माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यामुळे लिबरल पक्षाला निवडणूक जिंकण्यास मदत झाली. कार्नी यांनी ट्रूडोंपासून स्वतःला दूर केले. त्यांचा अलोकप्रिय कार्बन कर रद्द केला. मजबूत आर्थिक विकासाचे वचन दिले. कार्नी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर निवडणूक प्रचारात बदल झाला. त्याचा या पक्षाला निवडणूक फायदा झालेला दिसून येत आहे.

PREV

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर