
Pahalgam Terror Attack : 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. यामुळे पाकिस्तानचे नेते संतापले आहेत. दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सहकारी बिलावल भुट्टो जरदारी यांनी सिंधू जल कराराबाबत भडकाऊ विधान केले आहे. त्यांनी एका रॅलीत म्हटले आहे की, “मी सिंधू नदीच्या काठी उभा आहे आणि भारताला स्पष्ट संदेश देतो की या नदीत आमचे पाणी वाहिल किंवा तुमचे रक्त.”
बिलावल भुट्टो म्हणाले की, भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवले आहे. त्यांनी असेही म्हटले की पंतप्रधान मोदी आपले अपयश लपवण्यासाठी आणि लोकांना दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तानवर खोटे आरोप करत आहेत. बिलावल यांनी असेही म्हटले की भारताने सिंधू जल करार एकतर्फी रद्द केला आहे, तर स्वतः मान्य केले होते की सिंधू नदी पाकिस्तानची आहे.
शुक्रवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात ठरवण्यात आले की भारतीय नद्यांचे पाणी आता पाकिस्तानला जाऊ दिले जाणार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी सांगितले की सरकारने यावर एक संपूर्ण रोडमॅप तयार केला आहे.
पाटील म्हणाले की, प्रथम नद्यांमधून गाळ काढला जाईल, जेणेकरून पाण्याचा प्रवाह रोखता येईल आणि त्याचा मार्ग बदलता येईल. सरकार या दिशेने वेगाने पावले उचलत आहे जेणेकरून भारताचा एकही थेंब पाणी पाकिस्तानमध्ये पोहोचणार नाही.
भुट्टो यांनी असेही म्हटले की भारताने सिंधू जल करार एकतर्फी रद्द केला आहे, तर स्वतः मान्य केले होते की सिंधू नदी पाकिस्तानची आहे. सिंधू नदीच्या काठी सुक्कुर येथे उभे राहून त्यांनी भारताला इशारा दिला की, “सिंधू आमची होती आणि आमचीच राहील, मग त्यात आमचे पाणी वाहो किंवा त्यांचे रक्त.”