व्यवसायिक फायद्यांवर टीका:
ट्रम्प कुटुंब मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात व्यवसायात उतरले आहे. कतारमधील लक्झरी गोल्फ रिसॉर्टच्या बांधकामासाठी कतार सरकारच्या Qatari Diar या कंपनीसोबत करारही केला आहे. त्याचवेळी कतारसोबतचे राजकीय संबंध दृढ होणे टीकेला कारणीभूत ठरत आहे.
मात्र, ट्रम्प यांचे समर्थक यावर काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणतात. व्यवसाय त्यांच्या मुलांच्या देखरेखीखाली चालत असून, परदेशी सरकारांशी थेट करार ही कंपनी करत नाही, असे ते सांगतात. मात्र खाजगी कंपन्यांशी करार करण्यास परवानगी आहे, असे स्वतः कंपनीने म्हटले आहे.
व्हाइट हाऊसची प्रतिक्रिया:
या टीकेवर प्रतिक्रिया देताना व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “अध्यक्ष स्वतःला फायदा होईल असे काही करत आहेत असे समजणे निरर्थक आहे.”