
अमेरिकेतील डॅलस शहरात एका मोटेलमध्ये 50 वर्षीय भारतीय वंशाचे व्यक्ती चंद्रमौली नागमल्लैयाह यांची त्यांच्या पत्नी व मुलासमोरच क्रूरपणे शिरच्छेद करून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना 10 सप्टेंबरच्या सकाळी डाऊनटाऊन डॅलसच्या सॅम्युएल बुलेव्हार्डवरील Downtown Suites मोटेलमध्ये घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, 37 वर्षीय यॉर्डॅनिस कोबोस-मार्टिनेज नावाच्या व्यक्तीने नागमल्लैयाह यांच्यावर हिंसक हल्ला करून त्यांचा शिरच्छेद केला. तोही मोटेलमध्ये काम करत होता. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कॅपिटल मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे.
अटक अहवालानुसार, हा वाद एका तुटलेल्या वॉशिंग मशीनच्या वापराबाबत सुरू झाला. नागमल्लैयाह यांनी कोबोस-मार्टिनेज व एका महिला कर्मचाऱ्याला हे मशीन वापरू नका, असे सांगितले होते. ही सूचना त्या महिलेने अनुवाद करून दिल्यामुळे कोबोस-मार्टिनेज संतापला.
America Crime : चार्ली किर्क हत्येतील संशयिताचा नवा व्हिडिओ FBI ने केला जारी, हल्लेखोराचा शोध सुरु
सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, मोटेलमधील कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये कोबोस-मार्टिनेज खोलीतून बाहेर पडताना, स्वतःकडून मॅशेटी (मोठी तलवारीसारखी शस्त्र) काढताना आणि नागमल्लैयाह यांच्यावर हल्ला करताना दिसला.
एका सहकर्मीने पोलिसांना सांगितले की, तो नागमल्लैयाह यांचा पाठलाग करत ऑफिसपर्यंत गेला. नागमल्लैयाह ओरडत ऑफिसकडे धावत गेले, जिथे त्यांची पत्नी व मुलगा उपस्थित होते. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोबोस-मार्टिनेजने त्यांना दूर सारत हल्ला सुरू ठेवला.
हल्ल्यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल व की-कार्ड घेतले. त्यानंतर त्याने नागमल्लैयाह यांचे शिर शरीरापासून वेगळे केले. शिर जमिनीवर दोनदा लाथाडल्यानंतर ते उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकले.
घटनास्थळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासणीसाठी परिसर बंद केला होता.
Nepal Violence : नेपाळमध्ये चक्क हेलिकॉप्टरच्या मदतीने नेत्यांना वाचविले, बघा 10 बोलके फोटो!
घटनेनंतर Dallas Fire-Rescue पथकाने घटनास्थळी पोहोचून कोबोस-मार्टिनेजला रक्ताने माखलेला व मॅशेटी धरलेला पाहिले. पोलिस आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत कोबोस-मार्टिनेजने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या तो डॅलस काउंटी जेलमध्ये आहे. त्याच्यावर कॅपिटल मर्डरचा गुन्हा असून त्याला इमिग्रेशन होल्डदेखील ठेवण्यात आले आहे.
नोंदीप्रमाणे, कोबोस-मार्टिनेजचा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याला फ्लोरिडामध्ये कार चोरीसाठी, तसेच ह्यूस्टनमध्ये हल्ला व लहान मुलांशी गैरवर्तनाच्या आरोपांखाली अटक झाली होती.