रोज अंडी खाल्ल्याने प्रोटीनची कमतरता दूर होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे मेंदू, डोळे आणि हृदयाचे आरोग्य सुधारते, तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
उत्तम आरोग्यासाठी आहारतज्ज्ञ रोज एक अंडं खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांचा वापर करून चविष्ट पदार्थ बनवता येतात. अंडं असेल तर कमी वेळेत छान स्वयंपाक करता येतो. रोज दोन अंडी खाल्ल्याने तुम्हाला सुपर पॉवर मिळेल.
25
प्रोटीन -
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. ज्यांना प्रोटीनची कमतरता आहे, ते अंडी खाऊ शकतात. नियमितपणे अंडी खाल्ल्याने मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
35
वजन कमी करणे -
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त अंड्यांचा समावेश करावा. या आहारामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे अतिरिक्त खाणे टाळता येते.
रोज अंडी खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. विशेषतः गर्भवती महिलांनी रोज किमान एक अंडं खाण्याची सवय लावावी, असा सल्ला डॉक्टर देतात. मुलांच्या आहारातही अंड्यांचा समावेश करावा. वाढत्या मुलांसाठी हे खूप उपयुक्त ठरते.
55
हृदयाचे आरोग्य -
रोज अंडी खाणे हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी चांगले आहे. यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी अंडं हा एक उत्तम आहार आहे.