WiFi Security: आजकाल प्रत्येक घरात वाय-फाय गरजेचं झालं आहे. पण चांगला स्पीडवाला प्लॅन घेऊनही अनेकदा इंटरनेट स्लो चालतं. यामागे तुमचं वाय-फाय कुणीतरी चोरून वापरत असण्याची शक्यता असू शकते.
अनेकदा शेजारी किंवा जवळचे लोक तुमच्या नकळत वाय-फाय नेटवर्क वापरतात. तुम्ही जर पासवर्ड शेअर केला असेल किंवा तो खूप सोपा असेल, तर असं होणं सहज शक्य आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो आणि डेटाही लवकर संपतो.
26
कनेक्टेड डिव्हाइस कसे तपासाल?
तुमच्या वाय-फाय राउटरच्या सेटिंगमध्ये जा. तिथे 'कनेक्टेड डिव्हाइसेस' (Connected Devices) किंवा 'अटॅच्ड डिव्हाइसेस' (Attached Devices) हा पर्याय शोधा. इथे तुम्हाला तुमच्या नेटवर्कला जोडलेल्या सर्व डिव्हाइसेसची लिस्ट दिसेल. अनोळखी डिव्हाइस दिसल्यास त्याला लगेच ब्लॉक करा किंवा वाय-फायचा पासवर्ड बदला.
36
स्ट्राँग पासवर्ड का गरजेचा आहे?
अजूनही बरेच जण मोबाईल नंबर, नाव किंवा 12345678 असे सोपे पासवर्ड ठेवतात. असे पासवर्ड कुणीही सहज ओळखू शकतं. त्यामुळे स्ट्राँग पासवर्डसाठी कॅपिटल (A-Z), स्मॉल (a-z) अक्षरं, अंक (0-9) आणि स्पेशल सिम्बॉल्स (@, #, $, %) वापरा. पासवर्ड किमान 12 अक्षरांचा असावा. पासवर्ड बदलल्यावर अनोळखी डिव्हाइस आपोआप डिस्कनेक्ट होतात.
वाय-फाय लावल्यावर अनेकजण राउटर सेटिंग्जकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या राउटरमध्ये WPA2 किंवा WPA3 सिक्युरिटी मोड सुरू आहे का, हे तपासा. तसेच, WPS (WiFi Protected Setup) फीचर बंद करा. हे फीचर जरी सोपं असलं तरी ते सुरक्षित नाही, असं तज्ज्ञ सांगतात. राउटरचा फर्मवेअरही वेळोवेळी अपडेट करत राहा.
56
वाय-फाय स्लो होण्याची इतर कारणं
कुणी वाय-फाय चोरून वापरत नसलं तरी स्पीड कमी होऊ शकतो. राउटर घराच्या कोपऱ्यात ठेवणं, जाड भिंती, मायक्रोवेव्ह किंवा ब्लूटूथमुळे सिग्नलमध्ये अडथळा येणं, जुना राउटर वापरणं किंवा खूप दिवस राउटर रिस्टार्ट न करणं, ही काही कारणं आहेत. चांगल्या सिग्नलसाठी राउटर घराच्या मध्यभागी आणि उंच ठिकाणी ठेवा.
66
छोटीशी काळजी, मोठी सुरक्षा
आजच्या डिजिटल जगात वाय-फायच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. तुमचं इंटरनेट कुणी विनापरवानगी वापरल्यास केवळ स्पीड कमी होत नाही, तर तुमची वैयक्तिक माहितीही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे राउटर सेटिंग्ज तपासणं आणि स्ट्राँग पासवर्ड वापरणं खूप महत्त्वाचं आहे.