वायफायच्या माध्यमातून इंटरनेटचा स्पीड उत्तम मिळतो. पण याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. घरात वायफाय राउटर लावणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
घरात वायफाय राउटर लावत असल्यास त्यासाठी योग्य जागा कोणती असावी हे तुम्हाला माहिती असावे. याशिवाय बेडरुमपासून किती अंतरावर राउटर असावे याबद्दल अधिक जाणून घेऊया…
बहुतांशजण वायफाय राउटर 24 तास सुरू ठेवतात. खरंतर, वायफाय राउटर सतत सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.
वायफाय राउटरमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात. याचा थेट परिणाम शरिरावर होतो. यामुळे एक्सपर्ट्स सांगतात, काम नसल्यास राउटर बंद करावे.
वायफाय राउटर बेडरुमपासून जवळ असू नये. बहुतांशजण बेडरुममध्ये उत्तम इंटरनेट स्पीडसाठी वायफाय राउटर जवळच लावतात. पण असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
एक्सपर्ट्सनुसार, उत्तम इंटरनेटच्या स्पीडसाठी घरात राउटर सातत्याने उठबस होण्याच्या ठिकाणी लावू नये. त्याएवजी घरातील दरवाजा बाहेर किंवा बाल्कनीत लावावा.
एक्सपर्ट्सनुसार, 24 तास वायफाय सुरू ठेवल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. याशिवाय झोपताना वायफाय राउटर बंद करावा. जेणेकरून गंभीर आजारांपासून दूर राहता येईल.