Nighty Reuse आईची जुनी नाईटी आता फेकून देऊ नका. त्यापासून किचन ॲप्रन, कुशन कव्हर, स्टोरेज पाऊच, टेबल रनर आणि हँगिंग ऑर्गनायझर अशा घरगुती वापराच्या आणि सजावटीच्या सुंदर वस्तू बनवता येतात. या आयडिया बजेटमध्ये बसणाऱ्या आणि क्रिएटिव्ह आहेत.
आपल्या घरात आईची जुनी नाईटी अनेकदा कपाटाच्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहते. कापड चांगलं असूनही, जुनी झाली म्हणून आपण ती बाजूला ठेवतो. पण थोडी क्रिएटिव्हिटी वापरली, तर याच नाईटीपासून घरातल्या वापराच्या आणि सजावटीच्या सुंदर वस्तू बनवता येतात. कॉटन किंवा मऊ कापडाची जुनी नाईटी पुन्हा वापरण्यासाठी उत्तम असते. यामुळे केवळ पैसेच वाचत नाहीत, तर जुन्या कपड्यांना नवीन रूप देऊन तुम्ही घराला स्टायलिश लूकही देऊ शकता. तुमच्या घरीही आईची जुनी नाईटी असेल, तर ती फेकून देण्याऐवजी या भन्नाट आयडिया नक्की ट्राय करा.
26
जुन्या नाईटीचा चांगला भाग कापून तुम्ही त्यापासून किचन ॲप्रन बनवू शकता. विशेषतः कॉटनच्या नाईटीपासून बनवलेला ॲप्रन स्वयंपाक करताना खूप आरामदायक वाटतो. या ॲप्रनला तुम्ही समोर एक छोटा खिसा लावू शकता, ज्यात चमचा, रेसिपी नोट किंवा इतर लहान वस्तू ठेवता येतील. प्रिंटेड नाईटीपासून बनवलेला ॲप्रन किचनला आकर्षक लूक देतो.
36
जर नाईटीचे कापड रंगीबेरंगी किंवा फ्लोरल प्रिंटचे असेल, तर त्यापासून तुम्ही सुंदर कुशन कव्हर्स बनवू शकता. लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा बाल्कनीतील बैठकीच्या ठिकाणी हे कुशन कव्हर ठेवल्यास जागेचा लूकच बदलून जातो. जुन्या कपड्यांचा हा रियूज, बजेटमध्ये घर सजवण्याचा एक सोपा मार्ग आहे.
जुन्या नाईटीपासून लहान-मोठे स्टोरेज पाऊच बनवणं ही एक चांगली आयडिया आहे. यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान, शिलाईचं साहित्य, मोबाईल चार्जर, दागिने किंवा मुलांच्या लहान वस्तू ठेवू शकता. मऊ कापडामुळे हे पाऊच वजनाला हलके आणि वापरायला सोपे असतात. तुम्ही प्रवासातही हे पाऊच वापरू शकता.
56
घरातल्या डायनिंग टेबल किंवा सेंटर टेबलच्या सजावटीसाठी तुम्ही जुन्या नाईटीपासून टेबल रनर बनवू शकता. कापडावर सुंदर डिझाइन किंवा प्रिंट असेल, तर जास्त मेहनत न घेता एक डेकोरेटिव्ह पीस तयार होतो. त्याच्या कडेला लेस, फॅब्रिक बॉर्डर किंवा लटकन लावून तुम्ही त्याला आणखी आकर्षक बनवू शकता.
66
आईच्या जुन्या नाईटीपासून तुम्ही वॉल हँगिंग ऑर्गनायझर तयार करू शकता. यात अनेक खिसे बनवून तुम्ही कंगवा, चाव्या, रिमोट, स्टेशनरी किंवा लहान घरगुती वस्तू ठेवू शकता. तुम्ही हे ऑर्गनायझर तुमच्या खोलीत, किचनमध्ये किंवा स्टडी एरियामध्ये लावू शकता. यामुळे घर व्यवस्थित दिसेल आणि जुन्या कपड्यांचा उत्तम वापरही होईल.