Tea Tips - चहा हे सर्वाधिक घेतले जाणारे पेय आहे. बरेच जणा चहा घेण्यापूर्वी पाणी पितात. तर काही जण चहा घेतल्यावर पाणी घेतात. काही जण पाणी घेतच नाही. त्यामुळे जाणून घ्या याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात… चहासोबत पाणी घ्यावे का…
आपल्यापैकी बरेच जण चहाप्रेमी आहेत. चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरवात होत नाही असे आपल्याला वाटते. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ॲसिडिटी होऊ शकते. चहामधील कॅफीन आणि टॅनिनमुळे पोटात ॲसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा घेऊ नये. अनेकांना चहा घेतल्यावर ॲसिडिटी होते, याचे हेही कारण आहे. हे कसे टाळावे? जाणून घ्या.
26
ॲसिडिटी टाळण्यासाठी उपाय
सकाळी उठल्यावर दात घासल्यानंतर आधी पाणी प्या. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यावरच चहा घ्या. तज्ज्ञांच्या मते, यामुळे पोटातील ॲसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच दिवसभरात कधीही चहा घ्यायचा असेल तर आधी पाण्याचे दोन घोट घ्या. त्यानंतरच चहाचा आस्वाद घ्या. त्यामुळे अॅसिडिटी होणार नाही.
36
नारळपाण्याचे फायदे
रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा. त्याऐवजी नारळपाणी प्या. यामुळे पोटातील ॲसिड पातळ होते. काही जण पाण्याऐवजी नारळ पाणी घेतात. त्यानंतर चहाचा आस्वाद घेतात. त्यामुळे कॅफीनचा प्रभाव कमी होतो. यामुळे ॲसिडिटीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
चहापूर्वी कोमट पाणी प्या. यामुळे ॲसिड संतुलन राहते. रिकाम्या पोटी चहाऐवजी हलका नाश्ता करा. तरीही ॲसिडिटी झाल्यास दुधाच्या चहाऐवजी हर्बल, ग्रीन किंवा ब्लॅक टी प्या. काही जणांना दूध टाकलेला चहा सूट होत नाही. अशा वेळी इतर चहाचे प्रकार ट्राय करा.
56
दुधाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत
ज्यांना दुधाचा चहा टाळता येत नाही, त्यांनी चहाची पाने दुधासोबत उकळू नयेत. आधी ब्लॅक टी तयार करून घ्या आणि नंतर त्यात दूध घालून प्या. असे केल्याने चहाचा स्वाद कायम राहतो. तसेच अॅसिडिटी सारख्या समस्या होत नाहीत.
66
ॲसिडिटी टाळण्यासाठी आहार कसा असावा?
ॲसिडिटी टाळण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही. तेलकट, मसालेदार किंवा जंक फूड खाणे टाळा. तुम्हाला आधीच ॲसिडिटीचा त्रास असेल तर खाण्याच्या सवयी बदला, लवकर आराम मिळेल. त्यामुळे अनेक असे असते की तुम्हाला होत असलेली अॅसिडिटी चहामुळे नव्हे तर इतर पदार्थांमुळे होत असते. त्यामुळे एकदा हेही चेक करा.