Tomato Overeating टोमॅटो खायला अनेकांना आवडतात. काही जण तर कच्चे टोमॅटो खातात. त्यावर जरा मीठ आणि चाट मसाला टाकून टोमॅटो छान लागतात. पण जास्त टोमॅटो जास्त खाल्ल्याने होणाऱ्या ५ मोठ्या समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का… जाणून घ्या..
रोजच्या स्वयंपाकात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा एक असा घटक आहे, जो जेवणाला आंबट-गोड चव देऊन त्याची रुची वाढवतो. करीपासून सॅलडपर्यंत आणि सूपपासून चटणीपर्यंत, टोमॅटो अनेक पदार्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या या बहुउपयोगी गुणधर्मांमुळेच अनेक लोक त्याला आवडीने खातात.
27
जास्त टोमॅटो खाण्याचे नुकसान
टोमॅटोमध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. ते ॲनिमिया, दमा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरतात. याशिवाय, टोमॅटो कॅन्सरविरोधी म्हणूनही काम करतो. पण टोमॅटोचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत. होय, टोमॅटो जास्त खाल्ल्यास शरीराला गंभीर नुकसान होऊ शकते. या लेखात आपण टोमॅटो जास्त खाल्ल्याने होणाऱ्या ५ समस्यांबद्दल जाणून घेऊया.
37
ॲसिडिटीची समस्या वाढू शकते
टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. हे घटक पचनक्रियेदरम्यान ॲसिडचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे, जर तुम्ही जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ले, तर छातीत जळजळ (Heartburn) आणि ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना आधीपासूनच ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन मर्यादित ठेवावे.
जर तुम्हाला आधीपासूनच गॅसचा त्रास असेल, तर टोमॅटो जास्त प्रमाणात खाणे टाळा. टोमॅटोमध्ये असलेले ॲसिड आणि काही घटक गॅसची समस्या आणखी वाढवू शकतात. त्यामुळे, जर तुम्हाला टोमॅटो खायचाच असेल, तर तो कमी प्रमाणात खा.
57
किडनी स्टोनचा धोका वाढतो
किडनी स्टोन - जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल, तर चुकूनही टोमॅटो खाऊ नका. कारण टोमॅटोच्या बियांमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. हवं तर बिया काढून तुम्ही तो खाऊ शकता.
67
सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो
सांधेदुखी - टोमॅटोमधील काही गुणधर्मांमुळे सांधेदुखी आणि सूज येऊ शकते. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी टोमॅटो खाणे टाळावे.
77
छातीत जळजळ होऊ शकते
छातीत जळजळ - टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी गॅसची समस्या वाढवून छातीत जळजळ निर्माण करते. इतकेच नाही, तर ते जास्त खाल्ल्यास शरीरात विषारीपणा वाढू शकतो. यामुळे घशात आणि तोंडात जळजळ, चक्कर येणे अशा समस्या येतात.