आजच्या बँकिंगमध्ये एटीएम खूप महत्त्वाचे आहेत. पण पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेतच जावं लागायचं. बँक बंद झाल्यावर पैसे हवे असतील तर खूप अडचण यायची. या समस्येतूनच एटीएमची कल्पना पुढे आली. स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड-बॅरन यांनी जगातील पहिलं एटीएम बनवलं. २७ जून १९६७ रोजी लंडनच्या एनफिल्डमधील बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर हे मशीन बसवण्यात आलं. त्या काळात बँकिंग क्षेत्रातला हा एक मोठा शोध होता.
25
चॉकलेट वेंडिंग मशीनमधून सुचली एटीएमची आयडिया!
जॉन शेफर्ड-बॅरन यांना एटीएमची आयडिया कशी सुचली, यामागे एक भन्नाट किस्सा आहे. एकदा बँक बंद असल्यामुळे त्यांना पैसे काढता आले नाहीत. तेव्हा त्यांच्या डोक्यात चॉकलेट विकणाऱ्या ऑटोमॅटिक मशीनचा विचार आला. जर मशीनमधून चॉकलेट मिळू शकतं, तर मग पैसे का नाही? याच विचारातून एटीएमचा जन्म झाला. पण मशीनमधून पैसे काढणारी व्यक्ती खरी ग्राहक आहे की नाही, हे कसं ओळखायचं? या प्रश्नातूनच 'पिन' (PIN) सिस्टीम तयार झाली.
35
सुरुवातीला पिन ६ अंकी ठेवण्याचा होता विचार!
एटीएम पिन बनवताना जॉन शेफर्ड-बॅरन यांनी सुरुवातीला ६ अंकी नंबर ठेवण्याचा विचार केला होता. ते स्वतः सैन्यात होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या आर्मी आयडीसारखा ६ अंकी पिन ठेवायचा होता. जास्त अंक असतील तर पिन ओळखणं कठीण जाईल आणि सुरक्षा वाढेल, असं त्यांना वाटलं. पण हा निर्णय घेताना त्यांच्या लक्षात आलं की, प्रत्येकाला ६ अंक लक्षात ठेवणं सोपं जाणार नाही. यामुळे त्यांना आपला विचार बदलावा लागला.
जॉन शेफर्ड-बॅरन यांनी आपली पत्नी कॅरोलिन हिला ६ अंकी पिन लक्षात ठेवायला सांगितला. पण तिला फक्त ४ अंकच सहज लक्षात राहतात, त्यापुढचे अंक लक्षात ठेवणं कठीण जातं, असं तिने सांगितलं. त्यामुळे त्यांनी पिन ६ ऐवजी ४ अंकी करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना पिन सहज लक्षात राहावा, हाच यामागचा उद्देश होता. नंतर जगभरात एटीएमचा वापर वाढला आणि ४ अंकी पिनची पद्धतही लोकप्रिय झाली. अर्थात, काही बँका आणि देशांमध्ये आजही जास्त अंकी पिन वापरण्याची सुविधा आहे.
55
चार अंकी पिन किती सुरक्षित आहे?
चार अंकी पिन लक्षात ठेवायला खूप सोपा असतो. पण सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर यात फक्त १०,००० कॉम्बिनेशन्स (०००० ते ९९९९) बनू शकतात. जर पिन ६ अंकी असता, तर तब्बल १० लाख कॉम्बिनेशन्स बनले असते. यामुळे पिनचा अंदाज लावणं खूप कठीण झालं असतं. पण सुरक्षेसाठी फक्त पिनचे अंकच महत्त्वाचे नसतात. बँकेचे नियम, कार्ड सिक्युरिटी सिस्टीम आणि इतर सुरक्षा उपायही महत्त्वाची भूमिका बजावतात.
तुम्ही एटीएममध्ये सलग चुकीचा पिन टाकला, तर बँक तुमचे ट्रान्झॅक्शन थांबवते किंवा कार्ड ब्लॉक करते. थोडक्यात सांगायचं तर, लक्षात ठेवायला सोपं असल्यामुळेच ४ अंकी एटीएम पिन जगभरात लोकप्रिय झाला.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .