स्मार्टफोनच्या बाजारात IQOO, वनप्लस, सॅमसंग, गुगल आणि आयफोनचे नवीन मॉडेल्स दाखल झाले आहेत. या लेखात IQOO १३, वनप्लस १३ एस, सॅमसंग गॅलॅक्सी एस २५, गुगल पिक्सेल १० आणि आयफोन १७ या फोन्सची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल माहिती दिली आहे.
२०२५ मधील या फोनने केली पैसे वसूल खरेदी, कोणत्या फोनचा केला समावेश?
स्मार्टफोन्सच्या मार्केटमध्ये रोज नवीन नवीन फोन दाखल होत आहेत. यामध्ये काही नवीन स्मार्टफोनचा समावेश होतो. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
26
IQOO १३
विवोच्या सब ब्रॅण्डचा हा फोन गेमिंग आहे. तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एलिट लॉन्च होणारा फोन ठरला आहे. यामध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते. या फोनच्या मागच्या बाजूस अल्ट्रा वाईड आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ५४,००० रुपये आहे.
36
वनप्लस १३ एस
वन प्लस कंपनीचे विविध फोन मार्केटमध्ये येत आहेत. वनप्लस १३ एस फोन मार्केटमध्ये आला असून त्याची किंमत ५२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये ग्राहकांना १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजपर्यंत व्हेरिएंट मिळणार आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ हा फोन मार्केटमध्ये नवीन आला आहे. या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले असून १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. यामध्ये ४००० एमएचची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत ७४,९९९ आहे.
56
गुगल पिक्सेल १०
गुगलचा पिक्सेल १० अनेक एआय फीचर्सने उपयुक्त आहे. कंपनीने तो टोन्सर जी ५ प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. जो १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजला सपोर्ट करत असते. या फोनची किंमत ७९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
66
आयफोन १७
या वर्षात सर्वात यशस्वी विक्री झालेल्या फोनपैकी आयफोन १७ हा एक फोन आहे. या नवीन आयफोन मॉडेलला चांगली विक्री मिळाली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून आणि १८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.