WhatsApp वर करता येणार कॉल शेड्यूल, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Published : Jan 01, 2025, 02:41 PM IST
Whatsapp DP

सार

काहीवेळेस आपण मित्रमैत्रीण किंवा घरातील नातेवाईकांना फोन करायचे विसरतो. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल शेड्यूल करण्याचे फीचर आले आहे. याबद्दलची सविस्तर प्रोसेस सविस्तर जाणून घेऊया...

WhatsApp Call Schedule : व्हॉट्सअ‍ॅपचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच व्हॉट्सअ‍ॅपकडून कॉल शेड्यूल करण्याचे फीचर लाँच केले आहे. याचा वापर महत्वाचे फोन कॉल्स, मेसेज, इवेंटसाठी करू शकता. यासाठी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरील लहान प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल शेड्यूल करण्याची प्रोसेस

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल शेड्यूल करण्यासाठी फोनमध्ये सर्वप्रथ अ‍ॅप सुरू करा. यानंतर त्या ग्रुपवर जा जेथे कॉल शेड्यूल करायचे आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर मेसेज बारमध्ये खाली डाव्या बाजूला एक प्लस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. येथेच उजव्या बाजूला फोटो, कॅमेरा, लोकेशनसह काही ऑप्शन दिसतील. यामधील इवेंट आयकॉनवर क्लिक करा.

आता इवेंट क्रिएट करा आणि यासाठी इवेंटचे नाव लिहून वेळ सेट करा. मीटिंग लिंकच्या माध्यमातून सुरू करायीच असल्यास टॉगल ऑन करा. यामध्ये तुम्ही व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलपैकी एक पर्याय निवडा. यानंतर सेंड ऑप्शनवर क्लिक करा.

शेड्यूल कॉल रद्द करण्याची प्रोसेस

कॉल्स शेड्यूल केल्यनंतर एखाद्या कारणास्तव मीटिंग रद्द झाल्यास त्रस्त होऊ नका. मीटिंग रद्द करण्यासाठी चॅट्समध्ये जाऊन मीटिंग शेड्यूमध्ये एडिट इवेंटवर क्लिक करा. यानंतर मीटिंग रद्द करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करा

चॅट्स लॉक करण्यासाठी अशा चॅटवर क्लिक करा जे लॉक करायचे आहेत. यानंतर प्रोफाइवर क्लिक करुन चॅट लॉक करण्याचा पर्याय निवडा. यानंतर Lock this chat with fingerprint किंवा Lock this chat with face id पैकी एक पर्याय निवडा.

आणखी वाचा : 

तुमच्या आधार कार्डवर किती SIM Card रजिस्टर्ड? असे काढा शोधून

SIP चा हप्ता चुकवल्यास किती वसूल करतात दंड? जाणून घ्या रक्कम

PREV

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार