18
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या महत्वाची माहिती
दुपारच्या तीव्र उन्हात घरात उष्णता येऊ नये म्हणून खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. विशेषतः दक्षिण आणि पश्चिम बाजूच्या खिडक्यांवर लक्ष द्या.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 28
जाड पडदे किंवा ब्लॅकआउट कर्टन वापरा
हलके नाही तर जाड कापडी पडदे किंवा ब्लॅकआउट कर्टन वापरल्यास सूर्यप्रकाश थेट घरात येत नाही आणि घराचे तापमान कमी राहते.
38
छतावर पाणी शिंपडा
दुपारी किंवा संध्याकाळी छतावर पाणी शिंपडल्यास उष्णता कमी होते. ग्रामीण भागात हा उपाय खूप प्रभावी ठरतो.
48
पंख्यासमोर बर्फाचा भांडे ठेवा
पंख्यासमोर बर्फ किंवा थंड पाण्याचे भांडे ठेवल्यास हवेत थंडावा निर्माण होतो. हा एक सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे.
58
घरात हिरव्या झाडांची लागवड करा
तुळस, मनी प्लांट, अरेका पाम यांसारखी झाडे घरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. बाल्कनीत किंवा खिडकीजवळ झाडे ठेवा.
68
हलके रंग वापरा
भिंती, पडदे आणि बेडशीटसाठी हलके रंग (पांढरा, क्रीम, फिकट निळा) वापरल्यास उष्णता कमी शोषली जाते.
78
अनावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवा
टीव्ही, लॅपटॉप, ओव्हन यांसारख्या उपकरणांमधून उष्णता निर्माण होते. वापर नसताना ती पूर्णपणे बंद ठेवा.
88
रात्री नैसर्गिक वाऱ्याचा वापर करा
संध्याकाळी आणि रात्री खिडक्या उघडून क्रॉस व्हेंटिलेशन ठेवा. त्यामुळे घरात नैसर्गिक थंड हवा खेळती राहते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .