Cooker Rice : कुकरमधला भात गिचका होतोय? असा बनवा मोकळा, सुटसुटीत आणि चविष्ट!

Published : Mar 02, 2026, 09:10 AM IST

Simple Tricks for Fluffy Rice in a Pressure Cooker : कुकरमध्ये भात बनवणं सोपं आणि झटपट होतं. पण अनेकदा तो गिचका किंवा चिकट होतो, अशी अनेकांची तक्रार असते. पण काळजी करू नका, यावर एक सोपा उपाय आहे.

PREV
14
मुरमुऱ्यांसारखा मोकळा भात हवाय?
हो, भात बनवण्याची पद्धत थोडी बदलली की भात अगदी मुरमुऱ्यांसारखा मोकळा आणि सुटसुटीत होतो. यासाठी काही सोप्या टिप्स वापरा.
24
जुना तांदूळ असेल तर उत्तम
भात मोकळा होण्यासाठी तुम्ही कोणता तांदूळ निवडता हे महत्त्वाचं आहे. जुना तांदूळ वापरल्यास उत्तम. पण तो किमान तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
34
एका कपाला किती पाणी?
साधारणपणे, एक कप तांदळासाठी दीड ते अडीच कप पाणी घाला. तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे.
44
काय घालायचं?
कुकरमध्ये तांदूळ शिजवताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप घाला. किंवा एक चमचा लिंबाचा रस पिळा. यामुळे भात मोकळा होतो. शिट्टी झाल्यावर लगेच कुकरचं झाकण उघडू नका, पंधरा मिनिटांनी उघडा. यामुळे भात चांगला मुरतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories