पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज

Published : Sep 30, 2025, 08:50 AM IST

अनेकदा पावसात किंवा इतर वेळी फोनला नेटवर्कची समस्या येते, ज्यामुळे कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी फोन रिस्टार्ट करणे, एरोप्लेन मोड वापरणे आणि नेटवर्क प्रकार बदलणे यांसारख्या सोप्या ट्रिक्स वापरता येतात.

PREV
16
पावसात नेटवर्कची समस्या येते का, 'या' ट्रिक्स वापरून पाहिल्यावर फोनला येईल फुल रेंज

अनेकांना त्यांच्या फोनमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम जाणवत असतो. पण तो प्रॉब्लेम जाणवल्यामुळे त्यांना फोन येत नाही आणि त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीला फोन करता येत नाही. यासाठी आपण आज काही टिप्स जाणून घेणार आहोत.

26
आजकाल सर्वकाही मोबाईलवर अवलंबून

आजकाल सर्वकाही मोबाईलवर अवलंबून आहे. मग ते कॉल करणे असो, मेसेज पाठविणे असो किंवा इंटरनेट वापरणे असो, नेहमीच चांगल्या नेटवर्कची आवश्यकता असते. पण अनेक वेळा आपला फोन नीट नेटवर्क पकडत नाही किंवा कॉल ड्रॉप होऊ लागतो.

36
फोन रिस्टार्ट करून पहा

बऱ्याचवेळा फोनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असतात, त्या फोन रिस्टार्ट करून झाल्यानंतर बंद होतात. आपला फोन रिस्टार्ट करून काढल्यावर फोन परत नेटवर्कमध्ये यायला मदत होते.

46
एरोप्लेन मोड चालू करून बंद करा

एरोप्लेन मोड हा आपण चालू करून परत बंद करू शकता. आपण १० ते १५ सेकंड असं केल्यास आपल्या मोबाईलला परत नेटवर्क मिळायला मदत होते.

56
सिम कार्ड तपासून पहा

आपण सिम कार्ड व्यवस्थित आहे का नाही हे तपासून पहा. कधी कधी सिम कार्ड व्यवस्थित नसल्यावर नेटवर्क नसल्याचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी सिम कार्ड काढून ते स्वच्छ करा आणि परत टाका.

66
नेटवर्क प्रकार बदलून पहा

आपला फोन बऱ्याचवेळा एका फोन नेटवर्कमध्ये बरोबर रेंज पकडत नाही. अशावेळी आपल्याला कोणते नेटवर्क चांगली रेंज देत आहे हे तपासून पहा आणि नंतर ए बदलून टाका.

Read more Photos on

Recommended Stories