नाव ऐकून घाबरू नका. ही फक्त विमान प्रवाशांना आरामात प्रवास करण्यास मदत करणारी एक पद्धत आहे.
नेकेड फ्लाइंगसाठी सामानाची संख्या आणि वजन कमी करायचे असते.
सोप्या भाषेत, एका लहान बॅगेत फक्त गरजेच्या वस्तू घेऊन प्रवास करणे म्हणजेच नेकेड फ्लाइंग होय.
बॅग पॅक करण्याचं मोठं आव्हान सोपं करणं, हेच नेकेड फ्लाइंगचं मुख्य उद्दिष्ट आहे.
मोबाईल, चार्जर, पाकीट यांसारख्या गरजेच्या वस्तू एका लहान बॅगेत घेऊन केलेला विमान प्रवास उत्तम अनुभव देतो.
विमानतळावरील लांबलचक तपासणी, सामानाचे शुल्क टाळण्यास आणि चेक-इन लवकर करण्यास नेकेड फ्लाइंग मदत करते.
याचे अनेक फायदे असले तरी, ही पद्धत सर्वांसाठी नाही. कुटुंबासोबत प्रवास करताना ही पद्धत तितकीशी सोयीची ठरणार नाही.
Rameshwar Gavhane