रात्री झोपताना रिल्स पाहिले तर व्हाल आंधळे, मोबाईलचं वेड करून टाकील वेडं

Published : Nov 26, 2025, 01:00 PM IST

मोबाईलवर सतत रिल्स पाहिल्याने मेंदूची एकाग्रता कमी होते, झोपेवर वाईट परिणाम होतो आणि मानसिक थकवा जाणवतो. यामुळे डोळ्यांना त्रास, वेळेचा अपव्यय होऊन त्याचे व्यसनात रूपांतर होऊ शकते.

PREV
16
रात्री झोपताना रिल्स पाहिले तर व्हाल आंधळे, मोबाईलचं वेड करून टाकील वेडं

सध्याच्या काळात मोबाईलवर व्हिडीओ पाहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच रिल्स पाहून अनेकांना छान वाटत असतं, पण त्यावेळी आपण किती वेळ स्क्रीन पाहतो याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही.

26
मेंदूची एकाग्रता कमी होते

सतत वेगवेगळी छोटी व्हिडिओ पाहिल्यामुळे मेंदूला शॉर्ट स्पॅम अटेन्शनची सवय लागते. त्यामुळं लांबच फोकस करणं अवघड जात असत.

36
झोपेवर मोठा परिणाम होतो

रात्री झोपण्यापूर्वी रील पाहिल्यावर निळा प्रकाश झोपेचे चक्र बिघडवून टाकत असतो. यामुळे झोप कमी, उठल्यानंतर थकवा जाणवतो. त्यामुळं रात्री शक्यतो रिल्स पाहू नयेत.

46
मानसिक थकवा जाणवत राहतो

मेंदूवर सतत माहितीचा मारा होत राहतो. हे मानसिक थकवा, चिडचिड आणि मूड स्विंग्स निर्माण करू शकते. त्यामुळं मोबाईलवर रील पाहण्याचं प्रमाण मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

56
वेळेचा अपव्यय होत राहतो

मोबाईलवर रील पाहिल्यामुळं आपल्या वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत असतो. २ मिनिटे पाहू म्हणता म्हणता तास वायला जातात. यामुळे काम, अभ्यास आणि दैनंदिन गोष्टींमध्ये लक्ष कमी होते.

66
डोळ्यांना त्रास जाणवत राहतो

स्क्रीनकडे सतत बघण्यामुळे डोळे कोरडे पडतात, डोळ्यांची जळजळ होत राहते. त्यानंतर डोकेदुखीचा त्रास होत राहतो. रिल्स मर्यादित वेळेसाठी पाहायला हव्यात अन्यथा त्याच व्यसन लागायला सुरुवात होते.

Read more Photos on

Recommended Stories