Volkswagen ID Tiguan : सिंगल चार्जवर 600 किमी रेंज! 2 टन वजन ओढणारी सुपर ईव्ही कार

Published : Oct 13, 2026, 12:57 PM IST

फोक्सवॅगन आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' (ID Tiguan) 2027 मध्ये बाजारात लाँच करणार आहे. सिंगल चार्जवर तब्बल 600 किलोमीटर धावणारी ही कार तीन पॉवरट्रेन ऑप्शन्ससह येते.

PREV
14
फोक्सवॅगनची नवीन ईव्ही

Volkswagen ID Tiguan EV: जर्मन ऑटोमोबाईल कंपनी फोक्सवॅगन इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये आणखी एक नवीन मॉडेल आणत आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही 'आयडी टिगुआन' (ID. Tiguan) 2027 च्या सुरुवातीला युरोपियन मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार सिंगल चार्जवर तब्बल 600 किलोमीटरपर्यंत धावू शकते. ग्राहकांना यामध्ये तीन पॉवरट्रेन ऑप्शन्स मिळतील. उत्तम केबिन फीचर्स आणि नवीन डिझाईनसह कंपनीने ही कार रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट बनवली आहे.

24
नवीन डिझाईन आणि प्रीमियम केबिन

फोक्सवॅगनने या आयडी टिगुआनला 'प्युअर पॉझिटिव्ह डिझाईन' स्टाईलमध्ये तयार केले आहे. एलईडी लाईट्स आणि उंच एसयूव्ही लूकमुळे कारचा पुढचा भाग खूपच आकर्षक दिसतो. ग्लोबल मार्केटमध्ये सध्या असलेल्या ID.4 आणि ID.5 मॉडेल्सच्या जागी ही नवीन कार आणण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

कंपनीने कारच्या आतही मोठे बदल केले आहेत. ड्रायव्हरसाठी 10-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मनोरंजनासाठी 15-इंचाची टचस्क्रीन दिली आहे. पुढे बसणाऱ्या प्रवाशासाठी खास 12-इंचाची स्क्रीन मिळते. पॅनोरमिक सनरूफ, मसाज-व्हेंटिलेशन फीचर्स असलेल्या फ्रंट सीट्स आणि हरमन कार्डन (Harman Kardon) साऊंड सिस्टीमसारखे प्रीमियम फीचर्स यात आहेत.

34
तीन दमदार पॉवरट्रेन ऑप्शन्स

या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये 58 kWh बॅटरी आणि 188 hp पॉवर देणारी इलेक्ट्रिक मोटर मिळते. तर 77 kWh बॅटरी असलेले हाय-एंड व्हेरियंट 282 hp पॉवर जनरेट करते. टॉप व्हेरियंटमध्ये ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टीमसह जास्तीत जास्त 299 PS पॉवर मिळते. फोक्सवॅगनच्या दाव्यानुसार, WLTP मानकांनुसार ही कार व्हेरियंटनुसार सिंगल चार्जवर 600 किलोमीटरपर्यंत धावते. अर्थात, हवामान, ड्रायव्हिंग स्टाईल आणि रस्त्यांच्या स्थितीनुसार रिअल-वर्ल्ड रेंजमध्ये बदल होऊ शकतो.

दोन टन टोइंग कॅपॅसिटी

वन पेडल ड्रायव्हिंग, कनेक्टेड ट्रॅव्हल असिस्ट आणि ट्रॅफिक लाईट्स ओळखणारी ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम असे आधुनिक फीचर्स या कारमध्ये आहेत. कारच्या बॅटरीवर बाहेरील इलेक्ट्रिक उपकरणे चालवण्यासाठी V2L सिस्टीमही दिली आहे. ही नवीन एसयूव्ही तब्बल दोन टन वजन ओढू शकते (टोइंग कॅपॅसिटी), असा कंपनीला विश्वास आहे.

44
आयडी टिगुआन भारतात येणार का?

फोक्सवॅगनने 2027 च्या सुरुवातीला युरोपमध्ये या आयडी टिगुआन ईव्ही कारची विक्री सुरू करण्याचे टार्गेट ठेवले आहे. सध्याचे पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड टिगुआन मॉडेल्स बंद करून ही कार आणली जात नाहीये; तर त्या मॉडेल्ससोबतच ही आयडी टिगुआन मार्केटमध्ये उपलब्ध असेल. मात्र, भारतात या कारच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आपल्या देशात ही कार कधी येणार, हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories