विवोने भारतात Vivo X Fold 6 लाँच केला आहे. या फोनची किंमत २,१९,९९९ रुपये आहे. यामध्ये 200MP ZEISS कॅमेरा, 6900mAh ची मोठी बॅटरी आणि नवा Dimensity 9500 सुपर एडिशन प्रोसेसर दिला आहे. गेल्या वर्षी कंपनीने Vivo X Fold 5 दीड लाखांत लाँच केला होता. जुन्या मॉडेलची किंमत १,५९,९९९ रुपये होती, तर या नव्या व्हर्जनची किंमत २,१९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.