मध्यमवर्गीयांची फेव्हरेट स्विटी...! तब्बल 7 लाख लोकांनी खरेदी केली ही ईव्ही स्कूटर, कमी किमतीत जबरदस्त मायलेज!

Published : Oct 29, 2025, 10:25 AM IST

TVS iQube Electric Scooter : TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरने भारतीय बाजारात 7 लाख युनिट्स विक्रीचा मोठा टप्पा गाठला आहे. ही स्कूटर बजाज चेतक आणि एथर रिझ्टा सारख्या मॉडेल्सना जोरदार टक्कर देत आहे.

PREV
14
TVS iQube स्कूटरची विक्री

भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात मोठी स्पर्धा असताना, TVS iQube ने मोठी कामगिरी केली आहे. जानेवारी 2020 मध्ये लाँच झालेल्या या स्कूटरने 7 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

24
iQube चे खास फीचर्स आणि किंमत

TVS iQube अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 2.2kWh ते 5.3kWh बॅटरी पॅक मिळतात. दिल्लीत याची किंमत ₹1.03 लाख ते ₹1.73 लाख आहे. ही स्कूटर 94 किमी ते 212 किमी पर्यंत मायलेज देते. TVS iQube ची किंमत महाराष्ट्रात ₹1,11,422 (एक्स-शोरूम किंमत) पासून सुरू होते, जी 2.2 kWh व्हेरिएंटसाठी आहे, आणि 3.5 kWh व्हेरिएंटसाठी अंदाजे ₹1,32,043 पर्यंत जाते. लक्षात ठेवा, या किमतींमध्ये RTO आणि विमा (Insurance) यांसारखे 'ऑन-रोड' शुल्क समाविष्ट नाही.

34
TVS iQube चे सेफ्टी फीचर्स

या स्कूटरमध्ये IP67 रेटिंगची बॅटरी, 4.4kW पॉवरची मोटर आहे. सुरक्षेसाठी CBS, डिस्क ब्रेक, 'इकॉनॉमी' आणि 'पॉवर' मोड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन असे फीचर्स आहेत.

44
TVS मोटर कंपनीची दमदार स्कूटर

यात टेलिस्कोपिक सस्पेन्शन, 12-इंच चाके आहेत. बॅटरी 80% चार्ज होण्यासाठी 4 तास 40 मिनिटे लागतात. बजाज चेतक, एथर रिझ्टा, ओला S1 प्रो हे याचे मुख्य स्पर्धक आहेत.

Read more Photos on

Recommended Stories