इन्शुरन्स काढण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे की, कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स काढला पाहिजे, प्रीमियमची रक्कम किती असावी अशा काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
Finance Tips : भविष्यात आर्थिक जोखिमींपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक आणि बचत केल्या जातात. यासाठी विविध योजना देखील बँक, शासनाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. अशातच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत आर्थिक सक्षम असण्यासाठी बहुतांशजण इन्शुरन्स काढतात. इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार येतात. जसे की, लाइफ इन्शुरन्स, हेल्थ, ट्रॅव्हल अथवा कार इन्शुरन्सचा समावेश आहे. या सर्व गोष्टी भविष्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. पण इन्शुरन्स काढताना करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
इन्शुरन्स खरेदी करताना या गोष्टींची द्या लक्ष
इन्शुरन्सचे काही प्रकार असतात. त्यानुसार प्रत्येकजण आपल्या हिशोबाने इन्शुरन्स काढण्याचा विचार करतात. याशिवाय ज्या प्रकारचे वेगवेगळे इन्शुरन्स असतात, त्याच प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्या देखील असतात. यामुळे योग्य इन्शुरनची निवड करणे फार महत्त्वाचे असते.
योग्य कंपनीची निवड
इन्शुरन्स काढताना नेहमीच लक्षात ठेवावे की, कोणत्या कंपनीकडून इन्शुरन्स पॉलिसी घेत आहात. कंपनीसंदर्भात अधिक माहिती मिळवल्यानंतरच त्यांच्या माध्यमातून इन्शुरन्स काढण्याचा विचार करावा. यावेळी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, अशाच कंपनीची इन्शुरन्स काढण्यासाठी निवड करावी ज्यांचा जुना रेकॉर्ड उत्तम आहे. याशिवाय कोणत्या प्रकारच्या इन्शुरन्स काढायचा आहे हे देखील पाहावे.
कव्हर रक्कमेवर लक्ष द्या
आपण भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी इन्शुरन्स काढतो. अशातच इन्शुरन्स खरेदी करताना तुम्ही विचार केलेल्या गरजा पूर्ण होतायत का हे पाहा. काही वेळेस कमी रक्कमेचा अथवा अधिक रक्कमेचा इन्शुरन्स काढला जातो. पण एकूणच इन्शुरन्ससाठी किती रक्कम आपण भरू शकतो याकडे देखील लक्ष द्यावे. आपल्या बजेटनुसार इन्शुरन्स प्लॅन निवडावा.
वयाची मर्यादा
इन्शुरन्स खरेदी करताना फार महत्त्वाची गोष्ट अशी की, कोणत्या वयात इन्शुरन्स काढत आहात. सर्वसामान्यपणे 80-85 वर्षांपर्यंत इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध असतात. खरंतर, योग्य वयापर्यंतचा विमा काढावा.
आणखी वाचा :
SBI कडून ग्राहकांना अॅलर्ट, SMS आणि व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजसंदर्भात दिलीय ही महत्त्वाची सूचना
WhatsApp वर प्रोफाइल फोटोसाठी खास फिचर होणार लाँच, दररोज बदलता येईल DP