थर्ड पार्टी विमा कशासाठी लागतो?
थर्ड पार्टी वाहनाचे नुकसान झाल्यास.. म्हणजेच तुमच्या कारमुळे दुसऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाल्यास हा विमा खर्च कव्हर करतो. अपघातात एवढी व्यक्ती जखमी झाली किंवा मृत्यू झाला, तर हा विमा त्यांना आर्थिक मदत करतो. म्हणजेच एक प्रकारे तुमच्यावर ओझे पडू न देता, तुमच्या वाहनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळते.
तुमच्या वाहनामुळे कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास, नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, यासाठी मर्यादा असतात हे लक्षात ठेवावे. कमाल ₹७.५ लाखांपर्यंत असू शकते असे अनेक अहवाल सांगतात. योजनांनुसार हे बदलू शकते.