या पॉलिसीमध्ये, गुंतवणूकदाराला नफ्यासोबत बोनसचा लाभ मिळू शकतो. यामध्ये ५ लाख रुपयांचा विमा आणि ८.६० लाख रुपयांचा रिविजनल बोनस समाविष्ट आहे. या योजनेत १५ वर्षे गुंतवणूक केल्यास, दुप्पट बोनसचा लाभ मिळेल.
अपघाती मृत्यूसाठी विमा, अपंगत्व आणि गंभीर आजारांसाठी संरक्षण हे पॉलिसीचे इतर फायदे आहेत. तसेच, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, हमी रकमेच्या १२५% रक्कम नॉमिनीला दिली जाईल.