पंख्याच्या पात्यांवर धूळ जमा झाली की हवेचा झोत कमी होतो. त्यामुळे, आपण पंखा जास्त वेगाने किंवा जास्त वेळ चालवतो, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे वीज बिल वाढू शकतं.
आपल्या घरात पंखा दिवस-रात्र न थांबता फिरत असतो. सतत पंखा चालणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण, पंख्याच्या पात्यांवर जास्त धूळ साचली की लाईट बिल वाढतं, असं अनेकांना वाटतं. यात किती तथ्य आहे? धुळीमुळे पंख्याला खरंच जास्त वीज लागते का? चला, यामागचं खरं कारण जाणून घेऊया.
24
धूळ साचल्याने काय होतं?
पंख्याच्या पात्यांवर हळूहळू धुळीचा एक जाड थर तयार होतो. यामुळे पात्यांची हवा कापण्याची क्षमता कमी होते आणि हवेचा प्रवाह मंदावतो. परिणामी, घरात पूर्वीसारखी हवा लागत नाही आणि थंडावाही कमी झाल्यासारखं वाटतं. म्हणून, आपल्याला जास्त हवा हवी असल्याने आपण पंखा जास्त स्पीडवर किंवा जास्त वेळ चालवतो.
अशा वेळी, अप्रत्यक्षपणे विजेचा वापर वाढू शकतो. पण, धूळ साचल्यामुळे पंख्याची मोटर थेट जास्त वीज खेचते असं म्हणता येणार नाही. विजेचा वापर मुख्यत्वे मोटरची क्षमता, पंख्याचा वेग आणि तो दिवसातून किती वेळ चालतो यावर अवलंबून असतो.
34
पंखा साफ करण्याचे फायदे
आपण पंखा नियमितपणे स्वच्छ केल्यास पात्यांवर धूळ साचणार नाही. यामुळे हवेचा प्रवाह चांगला राहतो. पंखा साफ करताना, आपण मोटर किंवा कपॅसिटरची स्थितीही तपासू शकतो. जर पंखा 'कर्र... मर्र...' असा आवाज करत असेल किंवा हळू फिरत असेल, तर फक्त पाती साफ करून उपयोग नाही. मोटर किंवा इतर भागांमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असू शकतो. अशावेळी एखाद्या टेक्निशियनकडून तपासून घेणंच योग्य ठरेल.
तुमच्या घराचं लाईट बिल नियंत्रणात ठेवण्यासाठी पंख्याची क्षमता, व्होल्टेज आणि तो किती वेळ चालतो हे महत्त्वाचं आहे. साधारण सीलिंग फॅन सुमारे ५० ते ८० वॅट वीज वापरतात. पण, आता बाजारात आलेले नवीन टेक्नॉलॉजीचे BLDC फॅन फक्त २५ ते ३५ वॅट वीज वापरतात. त्यामुळे, घरात जास्त वेळ चालणाऱ्या पंख्यांऐवजी हे BLDC टेक्नॉलॉजीचे फॅन बसवणं वीज वाचवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
थोडक्यात सांगायचं तर, पंख्यावर धूळ साचल्यामुळे थेट लाईट बिल वाढत नाही. धुळीमुळे हवेचा झोत कमी होतो आणि आपण पंखा जास्त वेगाने चालवतो, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे बिल वाढण्याची शक्यता असते. म्हणून, पंखा स्वच्छ ठेवण्यासोबतच, मोटरची टेक्नॉलॉजी, पॉवर रेटिंग आणि वापराच्या वेळेकडे लक्ष दिल्यास वीज बिल नक्कीच कमी करता येईल.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .