स्वतःची कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय? आता फक्त ₹3.50 लाखात तुम्ही चारचाकी गाडी घेऊ शकता! या गाड्या कमी किमतीत जबरदस्त मायलेज देतात. चला पाहूया देशातील टॉप ५ मॉडेल्स कोणती आहेत.
मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स-शोरूम किंमत ₹3.50 लाख आहे. ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये येते. ही हॅचबॅक पेट्रोलवर 24.12-25.30 km/l आणि सीएनजीवर 32.73 km/kg मायलेज देते.
25
मारुती सुझुकी अल्टो
मारुती सुझुकी अल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत ₹3.70 लाख आहे. तुम्ही ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यायांमध्ये घेऊ शकता. हे हॅचबॅक मॉडेल पेट्रोलवर 24.39-24.90 km/l आणि सीएनजीवर 33.40-33.85 km/kg मायलेज देते.
35
रेनॉ क्विड (Renault Kwid)
रेनॉ क्विडची एक्स-शोरूम किंमत ₹4.30 लाखांपासून सुरू होते. ही हॅचबॅक मॉडेल पेट्रोलवर 22 km/l आणि सीएनजीवर 26.49 km/kg मायलेज देते.
टाटा टियागोची एक्स-शोरूम किंमत ₹4.57 लाख आहे. ही पेट्रोल आणि सीएनजी हॅचबॅक गाडी पेट्रोलवर 20 km/l आणि सीएनजीवर 27.28 km/kg मायलेज देते.
55
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)
मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत ₹4.70 लाखांपासून सुरू होते. ही पेट्रोल आणि सीएनजी हॅचबॅक पेट्रोलवर 24.97-26.68 km/l आणि सीएनजीवर तब्बल 34.43 km/kg इतकं प्रभावी मायलेज देते.