EMI वेळेवर भरूनही सिबिल स्कोअर कमी होतोय? यामागे असू शकतात ही कारणे

Published : Sep 04, 2026, 10:00 AM IST

तुम्ही दर महिन्याला EMI वेळेवर भरता, पण तरीही तुमचा CIBIL स्कोअर कमी झालाय का? यामागे फक्त EMI नाही, तर नकळतपणे होणाऱ्या काही चुकाही कारणीभूत असू शकतात.

PREV
15
हे तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम करतं
एकाच वेळी अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यास तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक बँक तुमच्या क्रेडिट रिपोर्टची तपासणी करते, तेव्हा 'हार्ड इन्क्वायरी' (Hard Inquiry) नोंदवली जाते. कमी वेळात जास्त हार्ड इन्क्वायरी झाल्यास, तुम्ही आर्थिक अडचणीत आहात असं कर्ज देणाऱ्या संस्थांना वाटू शकतं. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर कमी होऊ शकतो.
25
जुने, न वापरलेले क्रेडिट कार्ड बंद करणे चांगले आहे का?
तुमचं जुनं आणि न वापरलेलं क्रेडिट कार्ड लगेच बंद केल्यास CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. कार्ड बंद केल्यामुळे तुमची एकूण क्रेडिट मर्यादा (Credit Limit) कमी होते. यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (Credit Utilization Ratio) वाढतो आणि स्कोअर कमी होऊ शकतो. तसेच, जुनं खातं बंद केल्याने तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या लांबीवरही परिणाम होतो.
35
तुमच्या CIBIL रिपोर्टमध्ये दडलेल्या चुका!
तुमची काहीही चूक नसतानाही CIBIL रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असू शकते. उदा. दुसऱ्या व्यक्तीचं कर्ज तुमच्या नावावर दिसणं, चुकीची थकबाकी किंवा हप्त्याला झालेला उशीर चुकीचा नोंदवला जाणं. या गोष्टींमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे, वेळोवेळी CIBIL रिपोर्ट तपासा आणि चुका दिसल्यास लगेच दुरुस्तीसाठी अर्ज करा.
45
वर्षातून दोनदा CIBIL रिपोर्ट का तपासावा?
वर्षातून किमान दोनदा तुमचा CIBIL रिपोर्ट तपासणं ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुमच्या नावावरील कर्ज, क्रेडिट कार्ड, EMI आणि थकबाकीची माहिती योग्यरित्या नोंदवली आहे की नाही हे कळतं. चुकीच्या कर्जाची नोंद, भरलेला EMI उशिरा दाखवणे किंवा तुमच्याशी संबंध नसलेलं खातं दिसणं, अशा चुका तुम्ही लवकर ओळखू शकता. चुका आढळल्यास संबंधित बँक आणि क्रेडिट ब्युरोकडे तक्रार करून त्या दुरुस्त करता येतात. रिपोर्टवर सतत लक्ष ठेवल्यास तुमचा CIBIL स्कोअर सुरक्षित राहतो.
55
चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी काही सोप्या टिप्स
चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे सर्व EMI आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा. क्रेडिट लिमिटच्या ३०% पेक्षा जास्त वापर टाळा. गरजेशिवाय नवीन कर्जासाठी अर्ज करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वर्षातून किमान दोनदा तुमचा CIBIL रिपोर्ट तपासून त्यात काही चुका नाहीत ना, याची खात्री करा. या सवयींमुळे तुमचा स्कोअर चांगला राहील.
Read more Photos on

Recommended Stories