टाटा मोटर्स लवकरच आपली प्रसिद्ध सियारा गाडी ईव्ही रूपात लॉन्च करणार आहे. ही गाडी एका चार्जमध्ये ५०० किलोमीटरची रेन्ज देईल आणि यामध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअपसह अत्यंत आधुनिक इंटेरिअर असेल.
टाटा सियारा EV अवतारात मार्केटमध्ये लवकरच येणार, किती KM ची मिळणार रेंज?
टाटा कंपन्या त्यांच्या ईव्ही गाड्या मार्केटमध्ये लवकरच घेऊन येत आहे. आता काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली टाटा सियारा गाडी मार्केटमध्ये ईव्हीच्या रूपात येणार आहे.
26
गाडी किती किलोमीटर जाणार?
हि गाडी ५०० किलोमीटरच्या रेन्जपर्यंत पळणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. यामध्ये डीसी फास्ट चार्जींगसह बाय डायरेक्शनल चार्जिंगची सुविधा कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
36
टाटा ३ नवीन ईव्ही करणार लॉन्च
२०२६ साली कंपनी ३ नवीन ईव्ही गाड्या घेऊन मार्केटमध्ये येणार आहे. पंच ईव्ही फेसलिफ्ट आणि अविन्या प्लॅटफॉर्मवर आधारित पहिले प्रोडक्शन मॉडेल समाविष्ट आहे. कर्व्ह ईव्हीच्या वर स्थित, सिएरा ईव्ही प्रीमियम मध्यम आकाराच्या पाच-सीटरच्या शोधात असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करेल.
गाडीचं इंटेरिअर अपडेट करण्यात आलं असून आतापर्यंतची सर्वात भारी डिजिटल गाडी कंपनीकडून बनवण्यात येणार आहे. डॅशबोर्डमध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप मिळेल. ज्यामध्ये एक मोठा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सेंट्रोर इंफोटेनमेंट टचस्क्रीन आणि पॅसेंजर साइडसाठी वेगळे डिस्प्ले सामिल आहे.
56
गाडीत स्मार्ट फीचर्स
टॉप व्हेरिएंटमध्ये लेव्हल 2 ADAS, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टमचा समावेश असू शकतो. पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि अपग्रेडेड इंटीरियर मटेरियल देखील देऊ शकतात.
66
अजून कोणत्या फीचर्सचा असणार समावेश?
गाडीमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये खासकरून ऑफ फ्रंट फॅसिया, पूर्ण-लांबीचा एलईडी डेटाइम रनिंग लाईट बार, स्प्लिट हेडलॅम्प आणि गडद इन्सर्टसह नवीन बंपर आणि अधिक मजबूत खालचा भाग याचा समावेश होतो.