New Renault Duster SUV: नवीन रेनॉल्ट डस्टर मार्केटमध्ये होणार दाखल, कार प्रेमींमध्ये उत्सुकता

Published : Jan 05, 2026, 08:27 AM IST

रेनॉल्ट इंडिया लवकरच आपली लोकप्रिय एसयूव्ही डस्टर नवीन रूपात भारतीय बाजारात दाखल करणार आहे, ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या नवीन मॉडेलमध्ये वाय-शेपचे एलईडी लाईट्स, मोठे टचस्क्रीन आणि हायब्रीड पेट्रोल इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

PREV
15
New Renault Duster SUV: नवीन रेनॉल्ट डस्टर मार्केटमध्ये होणार दाखल, कार प्रेमींमध्ये उत्सुकता

भारतात सध्या नवीन गाड्यांचं फॅड मोठ्या प्रमाणावर आल्याचं दिसून येत आहे. आता रेनॉल्ट इंडिया हि कंपनी त्यांची गाडी नवीन रूपात घेऊन मार्केटमध्ये दाखल होणार आहे.

25
डस्टर गाडीचा टिझर झाला रिलीज

रेनॉल्ट इंडिया कंपनीची डस्टर गाडी मार्केटमध्ये लवकरच दाखल होणार आहे. डस्टर गाडीचा ट्रेलर पाहून ग्राहकांना उत्सुकता लागून राहिली आहे. एसयूव्ही गाड्यांच्या सेगमेंटमध्ये हि गाडी टॉपमध्ये राहणार आहे.

35
रेनॉल्ट गाडी लवकरच होणार मार्केटमध्ये होणार दाखल

भारतात या गाडीची विक्री लवकरच भारतात सुरु केली जाणार आहे. अपेक्षित एक्सटीरियर डिटेल्समध्ये वाय-शेपचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, वर्टिकल फ्रंट डिझाइन, प्रोनाउंस्ड व्हील आर्च क्लॅडिंग, रूफ रेल्स आणि मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल-लॅम्प्सचा समावेश आहे.

45
गाडीची व्हीलबेस किती?

जागतिक स्तरावर, नवीन डस्टरची लांबी सुमारे 4,300 मि.मी. आहे आणि 2,672 मि.मी. व्हीलबेस आहे. केबिनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले असलेले 10.1-इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग आणि पॉवर्ड टेलगेट असण्याची शक्यता आहे.

55
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाड्यांची होणार विक्री

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गाड्यांची विक्री केली जाणार आहे. Mild-Hybrid आणि Strong-Hybrid पेट्रोल पॉवरट्रेन तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

Read more Photos on

Recommended Stories