Parenting Tips: अनेकदा पालक घरात कपडे बदलताना मुलं त्यांना पाहत आहेत याकडे लक्ष देत नाहीत. ते निष्काळजीपणे मुलांसमोरच कपडे बदलतात, पण असं अजिबात करू नये. चला जाणून घेऊया यामागची महत्त्वाची कारणं.
मूल अजून लहान आहे आणि त्याला काही समजणार नाही, असा विचार करून पालक मोठी चूक करतात. पॅरेंटिंग कोच डॉ. अनुराधा सांगतात की, असा विचार मुलांना चुकीच्या दिशेने घेऊन जातो. त्यांच्या मानसिक विकासावरही याचा परिणाम होतो.
26
काही भाग खासगी असतात...
बॉडी बाऊंड्रीजची समज
जेव्हा पालक मुलांसमोर कपडे बदलत नाहीत, तेव्हा त्यांना संदेश मिळतो की शरीराचे काही भाग खासगी असतात आणि ते इतरांसमोर दाखवू नयेत. ही शिकवण त्यांना भविष्यात स्वतःच्या आणि इतरांच्या शारीरिक मर्यादांचा आदर करायला शिकवते.
36
बॅड टच ओळखण्यास मदत होते
बॅड टच ओळखण्यास मदत होते
जेव्हा मुलांना शिकवले जाते की शरीर खासगी आहे आणि कपडे बदलणे ही एक खासगी प्रक्रिया आहे, तेव्हा ते गुड आणि बॅड टचमधील फरक योग्यरित्या समजू शकतात.
भारतीय संस्कृतीत शरीर झाकणे आणि मर्यादा पाळणे हे संस्कारांचा भाग आहे. मुलांसमोर कपडे न बदलल्याने त्यांना कोणत्याही भीती किंवा दबावाशिवाय लाज, आदर आणि शिस्त यांसारखे गुण शिकता येतात.
56
भविष्यातील गोंधळापासून बचाव
भविष्यातील गोंधळापासून बचाव
अनेकदा मोठी झाल्यावर मुलं प्रश्न विचारतात किंवा अस्वस्थ होतात, कारण त्यांनी लहानपणी अशा गोष्टी पाहिलेल्या असतात ज्या त्यांना त्यावेळी समजलेल्या नव्हत्या. योग्य सवयी भविषतील गोंधळापासून वाचवतात.
66
मुलांसमोर कपडे बदलणे कधीपर्यंत योग्य आहे?
मुलांसमोर कपडे बदलणे कधीपर्यंत योग्य आहे?
तज्ज्ञांच्या मते, 2-3 वर्षांच्या वयानंतर मुलांसमोर कपडे बदलणे टाळावे. याच वयापासून मुलांना हळूहळू प्रायव्हसीचा अर्थ समजावून सांगता येतो.