New Air Travel Rules : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानप्रवासातील सुरक्षेसाठी नवीन कडक नियम लागू केले आहेत. यानुसार, उड्डाणादरम्यान पॉवर बँक वापरून उपकरणे चार्ज करण्यावर किंवा पॉवर बँक चार्ज करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानातील सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उड्डाणादरम्यान पॉवर बँक वापरणे किंवा त्याद्वारे मोबाईल व इतर उपकरणे चार्ज करणे पूर्णतः बंदीघातले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रवाशांना थेट एअरपोर्टवरून परत पाठवले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
27
पॉवर बँक चार्जिंगवर पूर्ण बंदी
DGCA ने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना आता उड्डाणादरम्यान
पॉवर बँक वापरून कोणतेही गॅझेट चार्ज करता येणार नाही
विमानातील सीट पॉवर आउटलेटचा वापर करून पॉवर बँक चार्ज करणेही मनाई आहे
हे निर्देश नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या ‘डेंजरस गुड्स अॅडव्हायजरी सर्क्युलर’ अंतर्गत देण्यात आले आहेत.
37
लिथियम बॅटरीमुळे वाढता धोका
जगभरात लिथियम बॅटरी गरम होणे, स्फोट होणे किंवा अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. DGCA च्या माहितीनुसार,
ओव्हरचार्जिंग
अंतर्गत शॉर्ट सर्किट
दाब पडणे
निकृष्ट दर्जाच्या किंवा जुन्या बॅटऱ्या
या कारणांमुळे लिथियम बॅटरी पेट घेऊ शकते. अशा आगी अत्यंत तीव्र असतात आणि अनेकदा त्या आपोआप कायम राहतात, त्यामुळे त्या विझवणे कठीण ठरते.
पॉवर बँक आणि अतिरिक्त बॅटऱ्या फक्त हँड बॅगेजमध्येच नेण्याची परवानगी आहे
त्या ओव्हरहेड बिन किंवा इतर केबिन लगेजमध्ये ठेवता येणार नाहीत
कारण अशा ठिकाणी आग लागल्यास ती वेळेत लक्षात येणे कठीण होते, असा इशारा DGCA ने दिला आहे.
57
विमान कंपन्यांसाठीही कडक निर्देश
DGCA ने सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या लिथियम बॅटरी संबंधित सेफ्टी रिस्क अस्सेसमेंटचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केबिन क्रूला अधिक प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. धूर, उष्णता, ज्वाला यांसारखी धोक्याची लक्षणे ओळखणे, अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, यासाठी क्रू सदस्य सज्ज असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
67
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
प्रवाशांनी कोणतेही उपकरण गरम होत असल्याचे, धूर येत असल्याचे किंवा विचित्र वास जाणवल्यास तत्काळ केबिन क्रूला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा सर्व घटनांची माहिती विमान कंपन्यांना DGCA कडे त्वरित द्यावी लागणार आहे.
77
अलीकडील घटनांमुळे नियम कडक
अलीकडच्या काळात विमानात पॉवर बँक किंवा लिथियम बॅटरीमुळे आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 19 ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळावर टॅक्सींगदरम्यान दिमापूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवाशाच्या पॉवर बँकला आग लागली होती. सुदैवाने केबिन क्रूने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
याआधीही एमिरेट्स, सिंगापूर एअरलाइन्ससह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आणि देशांनी असेच निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे DGCA चा हा निर्णय विमानप्रवासातील सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.