बीएसएनएलचा धमाका: एकाच सिमवर 4G आणि 5G नेटवर्क!

बीएसएनएलने 'युनिव्हर्सल सिम' (USIM) प्लॅटफॉर्म लाँच केला आहे ज्यामुळे ग्राहकांना नवीन सिमकार्ड न घेता 4G आणि भविष्यात 5G नेटवर्कचा लाभ मिळेल. ओव्हर-द-एअर (OTA) तंत्रज्ञानाद्वारे ग्राहक थेट 4G आणि 5G नेटवर्कवर त्यांचे सिम अपग्रेड करू शकतील.

Rameshwar Gavhane | Published : Aug 11, 2024 6:50 AM IST / Updated: Aug 11 2024, 12:22 PM IST

दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने त्यांच्या 4G विस्तारादरम्यान आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने 'युनिव्हर्सल सिम' (USIM) प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना नवीन सिमकार्ड न घेता 4G नेटवर्कचा लाभ मिळणार आहे. भविष्यात या सिमद्वारे 5G नेटवर्कचाही लाभ घेता येईल. म्हणजेच आता 4G किंवा 5G साठी नवीन सिम कार्ड घेण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांना या सुविधेचा देशभरात कुठेही लाभ घेता येणार आहे. याशिवाय बीएसएनएलने ओव्हर-द-एअर (ओटीए) तंत्रज्ञानही सादर केले आहे.

ओव्हर-द-एअर हे बीएसएनएलने सादर केलेले आणखी एक नवीन तंत्रज्ञान आहे. याद्वारे ग्राहक बीएसएनएल कार्यालयात न जाता थेट 4G आणि 5G नेटवर्कवर त्यांचे सिम अपग्रेड करू शकतील. या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे बीएसएनएलसाठी अधिक ग्राहक आकर्षित होतील.

BSNL ने 4G आणि नंतर 5G युनिव्हर्सल सिम केले लॉन्च

BSNL ने आपल्या 4G आणि 5G विस्तार योजनेचा भाग म्हणून ही नवीन तांत्रिक वैशिष्ट्ये सादर केली आहेत. देशात बीएसएनएलचा 4जी विस्तार वेगाने सुरू आहे. कंपनीने आतापर्यंत 15,000 हून अधिक टॉवरवर 4G सेवा सुरू केली आहे. यावर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस 80,000 टॉवर्स 4G मध्ये अपग्रेड करण्याचे लक्ष्य आहे. मार्च 2025 पर्यंत आणखी 21,000 टॉवर्स 4G वर अपग्रेड केले जातील. यामुळे देशभरातील बीएसएनएलचे एक लाख टॉवर 4जी नेटवर्कने सुसज्ज होतील. यानंतर, बीएसएनएल पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5G सेवा देखील सुरू करू शकते. ज्या शहरांमध्ये 5G सेवा सुरुवातीला सुरू होईल त्यांची यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे. नुकताच BSNL 5G सिम लाँच करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आणखी वाचा:

महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी 5 खास योजना, होणार मोठा फायदा 

Raksha Bandhan : बहिणीला गिफ्ट देण्यासाठी हे 5 स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट

दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण, नितेश राणेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

 

Share this article