भारताच्या इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या टाटा पंच ईव्हीने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. ही गाडी केवळ परफॉर्मन्समध्येच नाही, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही ग्राहकांची मनं जिंकत आहे.
भारताच्या इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये लोकप्रिय होत असलेल्या टाटा पंच ईव्हीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. नुकत्याच झालेल्या भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये या गाडीने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलं आहे. विशेष म्हणजे, हे रेटिंग फक्त टॉप मॉडेलला नाही, तर सर्व व्हेरिएंट्सना लागू आहे. प्रौढांच्या सुरक्षेसाठी या गाडीला 32 पैकी 31.09 पॉइंट्स मिळाले आहेत.
25
लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही जबरदस्त कामगिरी
लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही टाटा पंच ईव्हीने जबरदस्त कामगिरी केली आहे. चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनमध्ये गाडीला 49 पैकी 45 पॉइंट्स मिळाले आहेत. फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये 16 पैकी 15.28 आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये 15.80 पॉइंट्स मिळवून ही गाडी अपघातावेळी लहान मुलांना उत्तम सुरक्षा देते.
35
कुटुंबासाठी सुरक्षित इलेक्ट्रिक SUV
इतकंच नाही, तर या गाडीने साइड पोल इम्पॅक्ट टेस्टसुद्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या चाईल्ड रेस्ट्रेंट सिस्टीम (CRS) टेस्टमध्ये आणि ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स बसवण्याच्या बाबतीतही गाडीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. यामुळे, कुटुंबासाठी एक अत्यंत सुरक्षित इलेक्ट्रिक SUV म्हणून पंच ईव्हीने आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, गाडीच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), साइड आणि कर्टन एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर्स, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीचे फीचर्स स्टँडर्ड म्हणून दिले आहेत. त्यामुळे, अतिरिक्त सेफ्टी फीचर्ससाठी महागडं टॉप मॉडेल घेण्याची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
55
इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमधील सर्वोत्तम पर्याय
2024 मध्ये टेस्ट केलेल्या पंच ईव्हीच्या तुलनेत, प्रौढांच्या सेफ्टी स्कोअरमध्ये थोडा बदल झाला असला तरी, मुलांच्या सुरक्षेचा स्कोअर मात्र मजबूत राहिला आहे. एकूणच, टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टने भारतातील छोट्या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत स्वतःला एक आघाडीचं मॉडेल म्हणून सिद्ध केलं आहे.