Scooter Market: एथर एनर्जीने त्यांच्या रिझ्टा आणि 450 सीरिजच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मार्च 2026 साठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. जाणून घेऊया या बाबत अधिक….
दुचाकी बाजारातील आघाडीची कंपनी एथर एनर्जीने मार्च 2026 साठी खास ऑफर्स आणल्या आहेत. कंपनी आपल्या रिझ्टा आणि 450 सीरिजच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर ग्राहकांना तब्बल 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे.
25
5 हजारांचे अनुदान
केंद्र सरकारच्या PM E-Drive योजनेअंतर्गत मिळणारी 5 हजार रुपयांची सबसिडी 31 मार्च 2026 नंतर बंद होणार आहे. त्यामुळे, जे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत, त्यांनी या मुदतीपूर्वी खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
35
10 हजार रुपयांची सूट
या ऑफरमध्ये अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 10 हजार रुपयांची सूट मिळेल. सोबतच, 6,500 रुपयांची थेट रोख सवलत आणि 3,500 रुपये किमतीची अतिरिक्त कंपोनेंट वॉरंटी, असे एकूण 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
या ऑफर्स देशभरातील सर्व एथर एक्सपीरियन्स सेंटर्सवर उपलब्ध आहेत. पण कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही सवलत फक्त 31 मार्च 2026 पर्यंतच वैध असेल. त्यामुळे याच महिन्यात स्कूटर खरेदी करणाऱ्यांना हा लाभ मिळेल.
55
रिझ्टा स्कूटरची किंमत
या सवलतींनंतर, मुंबईत रिझ्टा S मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,04,758 रुपये आहे. तर एथर 450S मॉडेल 1,13,100 रुपयांना (एक्स-शोरूम, मुंबई) मिळत आहे. यावर ग्राहक 31 मार्चपूर्वी PM E-Drive योजनेअंतर्गत 5 हजार रुपयांचा फायदाही घेऊ शकतात.