SBI SCO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी तब्बल 996 जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.
SBI SCO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी संधी खुली केली आहे. SBI कडून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदासाठी तब्बल 996 जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी २ डिसेंबर २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
26
SBI कडून मोठी घोषणा, जवळपास हजार जागा रिक्त
SBI ने जाहीर केलेल्या मेगाभरतीत विविध पदांचा समावेश असून उमेदवारांनी त्यांच्या वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, अर्ज करण्याआधी सर्व निकष व्यवस्थित वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
36
अर्ज प्रक्रिया कालावधी
सुरुवात: 2 डिसेंबर 2025
अखेरची तारीख: 23 डिसेंबर 2025
अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा? – 3 पदांवर 996 भरती
SBI ने तीन प्रमुख पदांसाठी एकूण 996 भरती जाहीर केल्या आहेत.