SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने 'सर्कल बेस्ड ऑफिसर' (CBO) पदासाठी २२७३ जागांची भरती जाहीर केली. कोणत्याही शाखेतील पदवीधर, २ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये विशेष जागा राखीव आहेत
SBI CBO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २२७३ रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. 'सर्कल बेस्ड ऑफिसर्स' (CBO) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
26
रिक्त पदांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे एकूण २२७३ जागा भरल्या जातील. यामध्ये
नियमित पदे: २०५०
बॅकलॉग पदे: २२३
36
महाराष्ट्र आणि मुंबईसाठी आनंदाची बातमी!
या भरतीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी विशेष संधी आहे.
१. शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Degree) पूर्ण केलेली असावी.
२. अनुभव: उमेदवाराकडे कोणत्याही बँकेत किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
३. वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सूट मिळेल).
56
अर्ज शुल्क आणि प्रक्रिया
General/OBC/EWS: ७५० रुपये.
SC/ST/PWD: अर्ज शुल्क माफ (कोणतीही फी नाही).
महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे.
66
निवड प्रक्रिया आणि परीक्षा
या पदांसाठीची लेखी परीक्षा मार्च २०२६ मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते. अधिकृत जाहिरात नीट वाचूनच उमेदवारांनी आपले अर्ज बँकेच्या संकेतस्थळावर सादर करावेत.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .