स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात? संचार साथी पोर्टलवर कॉलवर अशी करा तक्रार

Published : Nov 11, 2025, 01:00 PM IST
Spam Call

सार

Spam Call : मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या मेसेजमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. दूरसंचार विभागाने (DoT) ‘संचार साथी पोर्टल’ सुरू केले आहे. 

Spam Call : मोबाईलवर सतत येणारे स्पॅम कॉल्स, अनोळखी क्रमांकांवरून येणारे फसवणुकीचे मेसेजेस आणि बँक व्यवहारांबाबतच्या बनावट लिंक यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. दिवसातून किमान काही वेळा “आपलं KYC अपडेट करा”, “लकी ड्रॉ जिंकलात” किंवा “बँक खातं ब्लॉक होणार” अशा संदेशांनी नागरिकांचे मोबाईल सतावत असतात. अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. नागरिकांच्या या त्रासावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) हे पोर्टल सुरू केले आहे. 

संचार साथी पोर्टल म्हणजे काय?

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications - DoT) सुरु केलेले ‘संचार साथी (Sanchar Saathi)’ हे एक केंद्रीकृत डिजिटल पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवणे, फसवणूक करणारे नंबर शोधणे आणि स्पॅम कॉल्सविरोधात तक्रार नोंदवणे यांसाठी एकाच ठिकाणी सेवा मिळते. हे पोर्टल https://sancharsaathi.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना फक्त त्यांचा मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे लॉगिन करून तक्रार नोंदवता येते.

स्पॅम कॉल किंवा मेसेजवर तक्रार कशी करायची?

  • स्पॅम कॉल किंवा मेसेजची तक्रार करणे अतिशय सोपे आहे. खालील काही स्टेप्स फॉलो करा:
  • संचार साथी पोर्टलला भेट द्या – https://sancharsaathi.gov.in
  • ‘Report Unwanted Communication’ हा पर्याय निवडा.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.
  • ज्या नंबरवरून स्पॅम कॉल किंवा मेसेज आला, तो क्रमांक भरा.
  • त्या कॉलचा किंवा मेसेजचा प्रकार निवडा – उदा. फसवणूक, जाहिरात, बँक स्कॅम इत्यादी.
  • आवश्यक तपशील भरल्यानंतर Submit Complaint वर क्लिक करा.
  • तुमची तक्रार संबंधित दूरसंचार कंपनीकडे पाठवली जाईल आणि त्या नंबरवर कारवाई केली जाईल. वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीचा ट्रॅकिंग स्टेटस देखील पाहता येतो.

पोर्टलवरील इतर उपयुक्त सेवा

  • ‘संचार साथी’ पोर्टल फक्त स्पॅम तक्रारींसाठीच नाही, तर मोबाईल सुरक्षेसाठी अनेक सुविधा देते.
  • Know Your Mobile Connection: तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत हे येथे पाहू शकता.
  • Report Lost or Stolen Phone: मोबाईल हरवल्यास तक्रार नोंदवून सिम ब्लॉक करता येतो.
  • Block/Unblock IMEI: हरवलेला फोन ब्लॉक करण्यासाठी IMEI नंबर वापरता येतो.
  • या सर्व सेवांमुळे नागरिकांना त्यांच्या मोबाईल वापरात अधिक सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळते.

स्पॅम कॉल्सपासून बचावासाठी काही टिप्स

  • अनोळखी लिंक किंवा OTP कधीही शेअर करू नका.
  • “Do Not Disturb (DND)” सेवा सक्रिय ठेवा.
  • कॉल येताच संशयास्पद व्यवहाराची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
  • बँक किंवा सरकारकडून कोणतेही व्यवहार अधिकृत अ‍ॅपवरच पूर्ण करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हे कसं काय झालं, महिंद्रा कंपनीची हि इलेक्ट्रिक गाडी ४ लाखांनी झाली स्वस्त; फीचर्स ऐकून पायाला येतील मुंग्या
December Discount : Maruti च्या या 9 कार्सवर बंपर डिस्काउंट, नवी कार घेण्याची हीच योग्य वेळ!