तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय का? टेक तज्ज्ञांनी सॅमसंग आणि एलजीच्या ऑपरेटिंग सिस्टीमची तुलना केली आहे. तुमच्यासाठी कोणता टीव्ही बेस्ट असेल, हे त्यांनी सांगितलंय.
नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार आला की, सॅमसंग (Samsung) आणि एलजी (LG) ही दोन नावं सर्वात आधी डोक्यात येतात. 'कंझ्युमर रिपोर्ट्स'च्या टॉप टीव्ही ब्रँड्सच्या यादीतही या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. 'Samsung QN65S90F' या मॉडेलने २०२६ मधील बेस्ट टीव्हीचा मान मिळवलाय. टीव्ही फक्त डिस्प्लेने नाही, तर तो किती 'स्मार्ट' काम करतो यावरही ठरतो. टेक तज्ज्ञांनी सॅमसंग आणि एलजी टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टीम, फीचर्स आणि एआय (AI) असिस्टंटबद्दल काय म्हटलंय, ते आपण पाहूया.
24
स्मार्ट टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टीम आणि वापर
सॅमसंग त्यांच्या टीव्हीमध्ये 'टायझेन' (Tizen) आणि एलजी 'वेबओएस' (webOS) ऑपरेटिंग सिस्टीम वापरते. दोन्ही टीव्ही होमपेजवर अॅप्स, सजेस्टेड व्हिडीओ आणि नुकतेच पाहिलेले कंटेंट 'टाईल' (Tile) स्वरूपात दाखवतात. डिझाईनच्या बाबतीत टेकराडार (TechRadar) आणि पॉकेट-लिंट (Pocket-lint) सारख्या टेक वेबसाईटस् सॅमसंगपेक्षा एलजीच्या webOS ला थोडं वरचढ मानतात. पॉकेट-लिंटच्या मते, एलजी टीव्हीचं सेटिंग्ज पॅनेल स्क्रीनच्या डाव्या बाजूला येतं. त्यामुळे पिक्चर सेटिंग्ज बदलताना मागचं दृश्य स्पष्ट दिसतं. पण सॅमसंग टीव्हीमध्ये सेटिंग्ज विंडो थेट स्क्रीनच्या मध्यभागी येते. युजर्सना हे थोडं त्रासदायक वाटू शकतं.
34
सॅमसंग बिक्सबी विरुद्ध एलजी थिनक्यू एआय
पूर्वी एलजी टीव्हीमध्ये थेट 'गुगल असिस्टंट' (Google Assistant) असायचा, त्यामुळे त्यांना चांगला फायदा मिळायचा. पण २०२५ मध्ये एलजीने ही सेवा बंद केली. सध्या दोन्ही ब्रँड्स फक्त अॅमेझॉन अलेक्सा (Amazon Alexa) सपोर्ट करतात. गुगल असिस्टंटऐवजी दोन्ही कंपन्यांनी 'मायक्रोसॉफ्ट कोपायलट' (Microsoft Copilot) एआय आणलं. पण एलजी युजर्सनी याला कडाडून विरोध केला. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये एलजीने हा आयकॉन लपवण्याचा पर्याय दिला. सॅमसंग टीव्हीमध्येही हे एआय फीचर आहे, पण ते सहज काढता येत नाही अशी युजर्सची तक्रार आहे. सॅमसंगचा स्वतःचा एआय 'बिक्सबी' (Bixby) आणि एलजीचा 'ThinQ AI' युजर्सची मनं जिंकू शकले नाहीत. टॉम्स गाईड (Tom's Guide) च्या रिव्ह्यू नुसार, "आज रात्री टीव्हीवर काय लागलंय?" अशा सोप्या प्रश्नांचीही बिक्सबी नीट उत्तरं देऊ शकत नाही.
टेक तज्ज्ञांच्या मते, एआय व्हॉईस असिस्टंटपेक्षा ऑपरेटिंग सिस्टीम (OS) वापरण्यासाठी किती सोपी आहे, यावर टीव्हीचा दर्जा ठरतो. वापराच्या सोयीनुसार एलजीची webOS थोडी पुढे असली, तरी सॅमसंगची Tizen OS देखील एक उत्तम पर्याय म्हणून आपली जागा टिकवून आहे.